शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

राज्यातील ६,७४२ दवाखान्यांमध्ये ‘त्रुटीं’चा बाजार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 16:59 IST

राज्यातील ६,७४२ दवाखाने-रुग्णालयांमध्ये विविध त्रुटी आढळून आल्याची धक्कादायक माहिती आरोग्य सेवेच्या अतिरिक्त संचालकांनी उघड केली आहे.

 अमरावती - राज्यातील ६,७४२ दवाखाने-रुग्णालयांमध्ये विविध त्रुटी आढळून आल्याची धक्कादायक माहिती आरोग्य सेवेच्या अतिरिक्त संचालकांनी उघड केली आहे. त्याअनुषंगाने त्रुटी आढळून आलेल्या राज्यातील या सर्व दवाखान्यांची पुनर्तपासणी करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत. १५ मार्च ते ३१ मे २०१७ या कालावधीत केलेल्या तपासणीत ६७४२ दवाखाने-रुग्णालयांमध्ये या त्रुटी आढळून आल्या होत्या. त्याअनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाºयांसह बृहन्मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकाºयांना तपासणीचा धडक कार्यक्रम देण्यात आला आहे. १ मे ते ३० जून २०१८ या कालावधीत समिती सदस्यांनी या सर्व दवाखान्यांची पुन्हा तपासणी करावी व त्रुटीची पूर्तता झाली किंवा कसे, याची खतरजमा करावी. त्याचा अहवाल कार्यालयास पाठविण्यात यावा, असे निर्देश कुटुंब कल्याण, माता-बाल ुसंगोपन व शालेय आरोग्य सेवेच्या अतिरिक्त संचालकांनी १९ मार्चला दिले आहेत. सदर तपासणीसाठी आरोग्य विभाग, महसूल, पोलीस व अन्न औषध प्रशासन विभागातील अधिकाºयांची संयुक्त पथके बनविण्यात येणार आहेत. तपासणीच्या या धडक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकाºयांकडे देण्यात आली आहे.

ज्या दवाखाने-रुग्णालयांमध्ये गतवर्षी त्रुटी आढळून आल्या होत्या, त्या त्रुटींची पूर्तता झाली किंवा कसे, याची खातरजमा करण्यासाठी पुनर्तपासणीचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यासाठी पथकांचे कार्यान्वयन केले जात आहे. - सीमा नैताम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती