अग्निशमनचे ६.७३ कोटी तीन वर्षांपासून अर्खचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST2021-05-05T04:21:38+5:302021-05-05T04:21:38+5:30

अमरावती : डीपीसीनेे अग्निशमन सेवा आणि आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरणासाठी दिलेला ६.७३ कोटींचा निधी महापालिकेकडे विनावापर पडून आहे. या निधीमधून ...

6.73 crore for firefighting for three years | अग्निशमनचे ६.७३ कोटी तीन वर्षांपासून अर्खचित

अग्निशमनचे ६.७३ कोटी तीन वर्षांपासून अर्खचित

अमरावती : डीपीसीनेे अग्निशमन सेवा आणि आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरणासाठी दिलेला ६.७३ कोटींचा निधी महापालिकेकडे विनावापर पडून आहे. या निधीमधून सेवांचे बळकटीकरण करण्याची मागणी बसपा गटनेता चेतन पवार यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.

अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण या शीर्षातंर्गत जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९, सन २०१९-२० व सन २०२०-२१ द्वारे ६.७३ कोटींचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. या निधीमधून सेवांच्या बळकटीकरणाचे कामे त्वरेने होणे अपेक्षित असताना निधी तसाच पडून आहे. याकडे पवार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

राज्यात अलीकडे विरार येथीळ कोविड रुग्णालयास आग लागून कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. सध्या उन्हाळ्याची स्थिती आहे व या काळात महापालिकेचा अग्निशमन विभाग सुसज्ज असणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण त्वरित करावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

Web Title: 6.73 crore for firefighting for three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.