६७ उमेदवार ‘आऊट’

By Admin | Updated: October 1, 2014 23:15 IST2014-10-01T23:15:00+5:302014-10-01T23:15:00+5:30

जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता जिल्ह्यात १३५ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.

67 candidates 'out' | ६७ उमेदवार ‘आऊट’

६७ उमेदवार ‘आऊट’

विधानसभा निवडणूक : आठ जागांसाठी १३५ उमेदवार कायम
अमरावती : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता जिल्ह्यात १३५ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.
मेळघाट मतदारसंघात दोन उमेदवारांनी शेवटच्या दिवशी दिवशी माघार घेतली आहे. यात भारिप-बमसंचे बन्सी बुध्दू मावसकर व अपक्ष लक्ष्मण ओंकार धांडे या दोघांचा समावेश आहे. आता या मतदारसंघात सहा उमेदवार कायम आहेत.
मोर्शी मतदारसंघात उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यात रोशनी दिलीप क्षीरसागर, संदीप अशोकराव रोडे, अशोकराव हरिभाऊ रोडे व श्याम लक्ष्मणराव बेलसरे यांचा समावेश आहे. मोर्शी मतदारसंघात आता १९ उमेदवार कायम आहेत.
दर्यापूर मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ९ उमेदवारांनी माघार घेतली. आता १९ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. बुधवारी उमेदवारी मागे घेणाऱ्यांमध्ये श्रीराम नेहर, भूषण खंडारे, अविनाश गायगोले, संतोष कोल्हे, बबन विल्हेकर, पीरिपाचे भाऊ रायबोले, विनीत डोंगरदिवे, क्षितिज अभ्यंकर, प्रभाकर भोकरे यांचा समावेश आहे.
धामणगाव रेल्वे मतदारसंघातून बुधवारी ११ उमेदवारांनी माघार घेतली आहे. यात अनिल आठवले, योगेश कावळे, बंडू आंबटकर, नीलम रंगारकर, राजेश पाठक, जयकिसन मते, अनिल वरघट, संजय पुनसे, दिनेश अंभोरे, मेहमुद हुसेन, मधुकर सोनारे यांचा समावेश आहे. आता १९ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.
अचलपूर मतदारसंघात बुधवारी सात जणांनी उमेदवारी मागे घेतली आहे. यात रमेश राईकवार, नामदेव झोड, नंदकिशोर वासनकर, ज्ञानेश्वर गादे, प्रभुदास मोहोड, नंदकुमार मडघे, तुळशीराम धुर्वे यांचा समावेश आहे. आता १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
अमरावती मतदारसंघात बुधवारी १२ उमेदवारांची निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. यात समीर देशमुख, सुधीर तायडे, सलीम बेग, मोहन साहू, किशोर हरमकर, शेख सुलतान शेख फकिरा, शेख अय्युब शेख घुडू, महेश तायडे, ज्योती काकणे, सपना ठाकूर, हरिदास शिरसाट व नरेंद्र हरणे यांचा समावेश आहे. आता या मतदारसंघात २० उमेदवार कायम आहेत.
तिवसा मतदारसंघात १२ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यात गजानन बोंडे, चंद्रशेखर कुरळकर, देवीदास निकाळजे, पवन देशमुख, भारत तसरे, संतोष महात्मे, अब्दुल अजीज पटेल, नाना मालधुरे, मिलिंद तायडे, रवींद्र खंडारे, संजय देशमुख, संजय कोल्हे यांचा समावेश आहे. येथे १८ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.
बडनेरा मतदारसंघात शेवटच्या दिवशी १० उमेदवारांनी माघार घेतली. यात अतुल झंझाळ, नितीन मोहोड, अब्दुल मजीद शेख महेमुद, हिंमत ढोले, विनोद सत्रावळे, रमेश आठवले, प्रवीण डांगे, कृष्णा गणवीर, सुनील गजभिये, अनिल वर्धे यांचा समावेश आहे. त्यामुळे बडनेरा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.

Web Title: 67 candidates 'out'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.