शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

चॉकलेटचे आमिष दाखवून ६५ वर्षीय वृद्धाकडून चिमुरडीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 11:04 IST

Amravati : येवदा पोलिसांकडून गुन्हा दाखल एलसीबीने पकडला आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्क येवदा : स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घरासमोर खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षीय वृद्धाने अत्याचार केला. त्याला स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी सायंकाळी अटक केली.

पोलिस सूत्रांनुसार, प्रकाश (६५) या आरोपी वृद्धाने घरापुढे खेळत असलेल्या चिमुकलीला पैसे व चॉकलेटचे आमिष देऊन आपल्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलगी बराच वेळ घराबाहेर आहे, ही जाणीव होताच तिच्या आईने बाहेर डोकावले. मात्र, ती घरापुढे खेळताना दिसत नसल्याने तिचा शोध घेण्यासाठी ती गावात फिरली. अशातच गावातीलच एका महिलेने प्रकाशने तिला सोबत नेल्याची माहिती दिली. आईने आरोपीच्या घरी जाऊन पाहिले असता, त्या मुलीचे कपडे रक्तस्रावामुळे लाल झाले होते आणि प्रकाशच्या अंगाला रक्त होते. दरम्यान नागरिकांनी त्याला घेराव घातला. मात्र त्याने तेथून पळ काढला. त्यामुळे पुढे पोलिस ठाण्यातदेखील मोठा जमाव एकत्र झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद केले.

नागरिकांच्या गराड्यातून निसटला आरोपी प्रकाशचे कृत्य पाहून हादरलेल्या चिमुकलीच्या आईने आरडाओरड केल्या नागरिक गोळा झाले. मात्र, त्याच वेळी आरोपी या गराड्यातून निसटला आणि शिवारात जाऊन लपला.

शिवारातून घेतले ताब्यात ठाणेदार राहुल देशमुख यांनी घटनास्थळाच्या पंचनाम्यानंतर आरोपीच्या शोधासाठी चमू रवाना केली. आरोपी घटनास्थरावरून फरार झाला होता. त्याला शोधण्याकरिता अमरावती येथील एलसीबी चमूदेखील सक्रिय झाली. एलसीबी पथकाने त्याला वरूड कुलट शिवारातून ताब्यात घेतले.

पोलिसात तक्रार मुलीने घडलेली हकीगत आपल्या आईला सांगितली तेव्हा तिच्यासमवेत आई-वडिलांनी येवदा पोलीस ठाणे गाठले. या खळबळजनक घटनेमुळे येवदा पोलिस ठाण्यापुढेही नागरिकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती