६,३१९ कृषीपंपांना जोडणी नाही
By Admin | Updated: April 20, 2017 00:12 IST2017-04-20T00:12:41+5:302017-04-20T00:12:41+5:30
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर उंचवावा, सिंचनाच्यासुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी शासनाद्वारा विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना विहीर मंजूर केल्या जातात.

६,३१९ कृषीपंपांना जोडणी नाही
पैसे भरुनही प्रतीक्षा कायम : शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्याची शोकांतिका
अमरावती : शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर उंचवावा, सिंचनाच्यासुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी शासनाद्वारा विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना विहीर मंजूर केल्या जातात. यावर करोडोंचा खर्च होतो, मात्र या विहिरींना कृषी वीज पंपांची जोडणी व्हावी, यसाठी पैसे भरूनही जोडण्या झाल्या नसल्याची धक्कादायक बाब आहे. शेतकरी आत्महत्याप्रवण असलेल्या जिल्ह्यात मार्च २०१७ अखेरपर्यंत सहा हजार ३१९ शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांचे अर्ज प्रलंबित असल्याची जिल्ह्याची शोकांतिका आहे.
जिल्ह्यात सिंचनाचा टक्का वाढावा याद्वारे शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न व्हावे, शेतकरी आर्थिक संपन्न होऊन शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हा हा डाग पुसल्या जावा, यासाठी शासनाद्वारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी धडक सिंचन विहिरींसह अनेक योजना राबविते. बँकांद्वारा विहीर खोदण्यासाठी कर्जाच्या विविध आहेत. या सर्वांच्या आधरे शेतकरी विहीर खोदतात. मात्र, या विहिरींना जर कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळालीच नाही, तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. मात्र, वीज कंपनीद्वारा शासनाने प्राधान्य दिलेल्या विषयाला साफ धुडकावून लावण्याचे चित्र आहे. मात्र २०१६ अखेर पैसे भरून अर्ज प्रलंबित असणारे सहा हजार १७ शेतकरी होते. त्यापैकी पाच हजार २६० शेतकऱ्यांना मार्च २०१७ अखेर वीज जोडण्या दिल्या आहेत. वर्षभर दाखल झालेले अर्ज व वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करणारे सहा हजार ३१९ शेतकऱ्यांना मार्च २०१७ अखेर पावेतो विज जोडणी मिळाली नाही. जोडणी मिळेल या आशेवर त्यांनी नियोजन केलेले उन्हाळी पिकांचे व येत्या खरीप हंगामाचे स्वप्न धुसर झाले आहे.