६२ हजार कोरोनाग्रस्त, उपचारादरम्यान १००७ संक्रमितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 05:00 IST2021-04-28T05:00:00+5:302021-04-28T05:00:58+5:30

सध्या जिल्ह्यात संसर्ग वाढला असतानाच लगतच्या नागपूर्, वर्धा व मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे तेथील रोज रुग्ण अमरावती जिल्ह्यात दाखल होत आहेत. यामध्ये गंभीर अवस्थेमधील बहुसंख्य रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल होत आहे. कोरोनासह अन्य आजार व उपचाराला झालेला उशीर यांसह अन्य कारणांमुळे आतापर्यंत तेथील १११ रुग्णांचा मृत्यू झाला.

62,000 coronaviruses, 1,007 infected deaths during treatment | ६२ हजार कोरोनाग्रस्त, उपचारादरम्यान १००७ संक्रमितांचा मृत्यू

६२ हजार कोरोनाग्रस्त, उपचारादरम्यान १००७ संक्रमितांचा मृत्यू

ठळक मुद्देजिल्ह्यातील ८९६, अन्य जिल्हे, राज्यातील १११ कोरोनाग्रस्तांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढता असताना मृत्यूचे सत्र वाढतेच असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे. मंगळवारपर्यंत  १००७ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये जिल्ह्यातील ८९६ तसेच अन्य जिल्हे व मध्य प्रदेशातील १११ संक्रमितांचा समावेश आहे.
सध्या जिल्ह्यात संसर्ग वाढला असतानाच लगतच्या नागपूर्, वर्धा व मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे तेथील रोज रुग्ण अमरावती जिल्ह्यात दाखल होत आहेत. यामध्ये गंभीर अवस्थेमधील बहुसंख्य रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल होत आहे. कोरोनासह अन्य आजार व उपचाराला झालेला उशीर यांसह अन्य कारणांमुळे आतापर्यंत तेथील १११ रुग्णांचा मृत्यू झाला.
 जिल्ह्यात पहिल्या संक्रमिताचा मृत्यू ४ एप्रिल २०२० रोजी हाथीपुऱ्यात झालेला होता. त्यानंतर सातत्याने रुग्णांचे मृत्यू होत आहेत. अमरावती जिल्ह्यात एप्रिल महिन्यात १०, मे ५, जून ९, जुलै ४०, ऑगस्ट ७४, सप्टेंबर १५४, ऑक्टोबर ७२, नोव्हेंबर १४, डिसेंबर १८, जानेवारी २२, फेब्रुवारी ९२, मार्च १६४ व एप्रिल महिन्यात आतापर्यंत २२२ रुग्णांचा मृत्यू झाला. असे एकूण ८९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पुन्हा १३ संक्रमितांचा उपचारादरम्यान मृत्यू
जिल्ह्यात उपचारादरम्यान मंगळवारी १३ मृत्यू झाले. यामध्ये जिल्ह्यात ४० वर्षीय पुरुष, (स्वावलंबीनगर), ३६ वर्षीय पुरुष, (बडनेरा), ८७ वर्षीय पुरुष, (योगिराज कॉलनी), २७ वर्षीय महिला, (मोर्शी), ५० वर्षीय महिला, (शिराळा), ४० वर्षीय महिला, (भैसदही), ४७ वर्षीय महिला, (अंबागेट), ७५ वर्षीय महिला, (महावीरनगर), तर अन्य जिल्ह्यातील ६७ वर्षीय पुरुष, (यवतमाळ), ५६ वर्षीय पुरुष, (बाजारगाव), ३६ वर्षीय महिला, (कारंजा, जि. वर्धा), ५४ वर्षीय पुरुष, (यवतमाळ), ६३ वर्षीय महिला, (यवतमाळ) या रुग्णांचा समावेश आहे.

मंगळवारी ८३८ नव्या रुग्णांची नोंद
जिल्ह्यात मंगळवारी नव्या ८३८ रुग्णांची भर पडल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ६२,८७२ झाली आहे.  या पाच दिवसांत संक्रमितांची संख्या वाढतीच आहे. मंगळवारी ३,६३५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २३.०५ पॉझिटिव्हिटी नोंद झाली आहे. आतापर्यंत शांत असलेल्या ग्रामीण भागातून कोरोनाग्रस्तांची मोठी संख्या येत असल्याने चिंता वाढली आहे. 

 

Web Title: 62,000 coronaviruses, 1,007 infected deaths during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.