६२ वर्षांनंतर जिल्ह्याला मिळणार केंद्रीय मंत्रीपद?

By Admin | Updated: May 17, 2014 23:09 IST2014-05-17T23:09:23+5:302014-05-17T23:09:23+5:30

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ मध्ये पहिल्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली. अर्थातच काँग्रेसने सत्ता स्थापन केली. यावेळी देशाचे पहिले कृषिमंत्री होण्याचा मान

62 years later, the union minister will get the district? | ६२ वर्षांनंतर जिल्ह्याला मिळणार केंद्रीय मंत्रीपद?

६२ वर्षांनंतर जिल्ह्याला मिळणार केंद्रीय मंत्रीपद?

>अमरावती : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ मध्ये पहिल्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली. अर्थातच  काँग्रेसने सत्ता स्थापन केली. यावेळी देशाचे पहिले कृषिमंत्री होण्याचा मान अमरावतीतून डॉ. पंजाबराव उपाख्य  भाऊसाहेब देशमुख यांना मिळाला. तेव्हापासून म्हणजे तब्बल ६२ वर्षांनी पुन्हा अमरावती जिल्ह्याच्या वाट्याला  केंद्रीय मंत्रीपद येण्याची सुखावह चिन्हे दिसू लागली आहेत.
सोळाव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली.    ‘मोदी’फॅक्टरचा झंझावात काँग्रेसचे  पानितपत करणारा ठरला. देशभर कमळ फुलले. स्थानिक पातळीचा विचार करता सत्ता स्थापनेत घटक पक्ष  असलेल्या शिवसेनेचे आनंदराव अडसूळ पाचव्यांदा लोकसभेत गेले. ते  लोकसभेत सलग दुसर्‍यांदा अमरावती  जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतील. आनंदरावांची सिनिअँरिटीआणि राजकारणाची जाण लक्षात घेऊन  यावेळी त्यांना  केंद्रीय मंत्रीपद नक्की मिळणार, अशी अनेकांना आशा आहे. असे झाल्यास अडसुळांच्या रुपाने १९५१ नंतर  अमरावतीला पुन्हा केंद्र सरकारचा ‘लालदिवा’ मिळेल, अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे.
देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सन १९५१ पासून १९६२ पर्यंत लोकसभेत अमरावतीचे  प्रतिनिधीत्व केले. त्यांना देशाचे पहिले कृषिमंत्री होण्याचा बहुमान मिळाला. त्यानंतर अमरावतीचा गड काँग्रेसने  १९८९ पर्यंत राखला. यादरम्यान देशात काँग्रेस पक्षाचीच सत्ता होती. मात्र, येथील काँग्रेसच्या खासदाराला  ‘लालदिवा’ मिळू शकला नाही. त्यानंतर अमरावतीच्या राजकीय आसमंतात १९९६ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा  भगवा फडकला. सन २00९ पासून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघात दुसर्‍यांदा  विजयी झाले. पहिल्यांदा १९९६ मध्ये ते लोकसभेत गेले. त्यानंतर १९९९ व २00४ मध्ये त्यांनी खासदारकीची  हॅट्ट्रिक केली.  त्यानंतर अमरावती मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने त्यांनी बुलडाण्यातून येऊन   शिवसेनेतर्फे २00९ मध्ये निवडणूक लढविली आणि जिंकली सुध्दा. यंदा ‘मोदी लहरी’मुळे असो वा अन्य  कारणांनी त्यांचा लोकसभेतील पाचवा विजय ठरला. २00३ -२00४ मध्ये वाजपेयी सरकारमध्ये ते केंद्रीय अर्थ  राज्यमंत्री होते.अडसूळ सेनेचे दुसर्‍या फळीतील नेते आहेत. यामुळे अमरावतीला ते पुन्हा लालदिवा मिळवून देतील  काय? याबद्दल चर्चा रंगत आहेत. 

Web Title: 62 years later, the union minister will get the district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.