बडनेरात लोकअदालतीतून ६२ प्रकरणांचा निपटारा
By Admin | Updated: November 6, 2016 00:15 IST2016-11-06T00:15:22+5:302016-11-06T00:15:22+5:30
विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ‘न्याय आपल्या दारी’ फिरत्या लोकअदालतीमधून बडनेऱ्यात ६२ दिवाणी व ...

बडनेरात लोकअदालतीतून ६२ प्रकरणांचा निपटारा
उपक्रम : नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन
बडनेरा : विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ‘न्याय आपल्या दारी’ फिरत्या लोकअदालतीमधून बडनेऱ्यात ६२ दिवाणी व किरकोळ स्वरुपांच्या फौजदारी खटल्याचा निपटारा करण्यात आला. शुक्रवार ४ रोजी लोक अदालत घेण्यात आली. यावेळी न्यायधिशांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.
राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने फिरते विधी सेवा लोक अदालत सुरु केली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी एक महिना हा उपक्रम राबविला जाणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी बडनेऱ्यातील महावीर भवन येथे 'न्याय आपल्या दारी' या लोकअदालतीतून ६२ किरकोळ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. १११ आरोपींकडून ४० हजार रुपयांचा दंड वसूलण्यात आला. लोकअदालती पूर्वी उपस्थितांना न्यायाधीश एस.डी. कुऱ्हेकर यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येकाने आपले जीवन चाकोरी बद्ध ठेवावे. कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. फिरत्या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविला जात आहे. मार्गदर्शन कार्यक्रमाला न्यायाधीश एस.डी. कुऱ्हेकर, अनंत टेंगसे, अंजली चौरे, सोनाली जगताप, पो. निरीक्षक डी. एम. पाटिल, अधिवक्ता ए.व्ही. चुटके, पी.पी. पाटील, मन्सुरी न्यायालयीन कर्मचारी जे. जी. पाटील, एस.एस. उगले, रविकुमार घडेकर, शीतल तिडके हे उपस्थित होते. मार्गदर्शन कार्यक्रमाचे आभार पो. निरीक्षक डी. एम. पाटील यांनी मानलेत. बडनेरा येथील लोकअदालतीतून ठाण्यातील बहुतांश किरकोळ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)