पेन्शन परतीच्या नोटीसला ६,१४२ शेतकऱ्यांचा ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:08+5:302021-06-02T04:11:08+5:30
(असाईनमेंट) अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील रकमेचा लाभ घेत असलेल्या जिल्ह्यातील ७,६०४ आयकरदात्या शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये नोटीस बजावण्यात आल्या ...

पेन्शन परतीच्या नोटीसला ६,१४२ शेतकऱ्यांचा ठेंगा
(असाईनमेंट)
अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील रकमेचा लाभ घेत असलेल्या जिल्ह्यातील ७,६०४ आयकरदात्या शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये नोटीस बजावण्यात आल्या होत्या. यापैकी १,४४२ नागरिकांनी १.२९ कोटीची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे परत केली, तर ६,१४२ शेतकऱ्यांकडील ४.३८ कोटींची रक्कम शासनाला अप्राप्त आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये सहा हजारांचे पेन्शन दिले जाते. आयकरदात्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थींच्या यादीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासनाच्या निर्देशांनुसार या शेतकऱ्यांकडून रक्कम परत करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. जिल्ह्यात योजनेचे ३,३३,९११ लाभार्थी आहेत. त्यापैकी आयकरदात्या ७,६०४ शेतकऱ्यांनी ५.६७ कोटींची रक्कम परत करावी, अशा नोटीस जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्रत्येक तहसीलदाराने बजावल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
बॉक्स
आतापर्यंत १.२९ कोटी वसुल
आयकरदात्या शेतकऱ्यांकडून आतापर्यंत १,२९,३२,००० रुपये परत घेण्यात आले आहेत. यामध्ये अमरावती तालुक्यात २२ लाख १४ हजार रुपये, भातकुली ६ लाख नांदगाव खंडेश्वर २ लाख ८६ हजार, अचलपूर २१ लाख २८ हजार, चांदूर बाजार १२ लाख ५० हजार, मोर्शी २२ लाख २४ हजार, वरूड १३ लाख २८ हजार, दर्यापूर २० लाख ३० हजार, अंजनगाव सुर्जी ७ लाख ६८ हजार, धारणी ३० हजार व चिखलदरा तालुक्यातून ७४ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.
कोट
पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन समान किस्तींमध्ये रक्कम त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते. यात काही आयकरदात्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. त्यांना नोटीस बजावण्यात आल्या व रक्कम वसुल करण्याची प्रक्रिया तहसीलस्तरावर सुरू आहे.
- नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी
पाईंटर
पीएम किसान पेन्शन योजनेचा आढावा
पीएम किसान योजनेचे लाभार्थी : ३,३३,९११
आतापर्यंत पैसे परत करणारे शेतकरी :१,४४२
पैसे परतीसाठी नोटीस पाठविलेले शेतकरी : ७,६०३
रक्कम वसुलपात्र शेतकरी : ६,१४२