६० लाखांच्या पुलाची लागली वाट
By Admin | Updated: August 5, 2016 00:23 IST2016-08-05T00:23:00+5:302016-08-05T00:23:00+5:30
तालुक्यातील पाक प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांना खडका ते एरंडवाडी पांदण रस्ता जोडणारा पूल पाटबंधारे विभागाने ....

६० लाखांच्या पुलाची लागली वाट
खडका-एरंडवाडी पांदण रस्ता : पहिल्या पुरातच हानी, कंत्रादाराची मनमानी
वरूड :तालुक्यातील पाक प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांना खडका ते एरंडवाडी पांदण रस्ता जोडणारा पूल पाटबंधारे विभागाने मंजूर करून बांधकाम सुरू केले. या पुलाचे कंत्राट देऊन कंत्राटदाराने दीड वर्षांपासून काम सुरू केले. सदर कामाची मुदत १० महिने असताना अपूर्ण असलेला हा पूल पूर्ण व्हावा, म्हणून पाटबंधारे विभागाने संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावल्या होत्या. पुलाचे काम प्रगतीवर असताना पावसाळ्यात आठ दिवसांपूर्वी पाक नदीला पूर आल्याने पुलावरचे दोन स्लॅब वाहून गेला. या ६० लाख रुपयांच्या पुलाची वाट लागली असून कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे हा पूल आजही अपूर्णावस्थेत आहे.
तालुक्यातील पाक नदी प्रकल्पाच्या बॅकवाटरमध्ये येणाऱ्या खडका ते एरंडवाडी पांदण रस्त्यावर पूल नसल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यायेण्याकरिता त्रास होत होता. अनेक शेतकऱ्यांनी त्यांची शेती पडीक ठेवली होती.
अखेर आ.अनिल बोंडे यांनी पाठपुरावा करून पाक नदीवरील पूल पाटबंधारे विभागाकडून ६० लाख रूपये अंदाजित किमतीचा पूल मंजूर करून जानेवारी २०१५ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. पुलाच्या पूर्णत्वाकरिता १० महिन्यांचा कालावधी होता. कामाचा कालावधी नोव्हेंबर २०१५ मध्ये संपल्याने अमरावती पाटबंधारे विभागाने कंत्राटदाराला नोटीशी बजावल्या होत्या. कंत्राटदाराने काम अपूर्णावस्थेत ठेवल्याने पाटबंधारे विभागाने कामाच्या पूर्णत्वाकरिता नोटीस बजावून दंडात्मक कारवाईसुद्धा केल्याचे सांगण्यात आले. पुलाचे काम सुरू असताना तीन स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते, तर यातील एक पूर्ण झाला.
दोन टप्प्यांचे काम सुरू असताना कंत्राटदाराने नदीतील साहित्य साठवून ठेवले होते. पावसाळा सुरू झाल्याने आठ दिवसांपूर्वी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला. याच दिवशी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांचे काम सुरू होते. पावसाळ्यात काम करताना पावसाचा अंदाज घेऊन कंत्राटदाराने काम करावे, अशा सूचनासुद्धा कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग अमरावती यांनी प्रत्यक्ष दिल्या होत्या. परंतु तरीही कंत्राटदाराने सेंट्रिंग लावून स्ॅलब टाकला होता. मोठा पूर आल्याने सर्व काही वाहून गेले. यमाुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले. कंत्राटदाराची मनमानी आणि हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाल्याची चर्चा असून पुन्हा खडका ते एरंडवाडीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने शतकऱ्यांना शेतात ये-जा करणे कठीण झाले आहे. यावर्षीसुद्धा शेकडो हेक्टर जमीन पडीक राहण्याची शक्यता वर्तवण्यिात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)