खतांच्या किमतीत ६० टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:12 IST2021-04-10T04:12:26+5:302021-04-10T04:12:26+5:30
राजुरा बाजार : रासायनिक खतांच्या भावात ५८ ते ६० टक्के अशी भरमसाठ भाव वाढ झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कंबरडे ...

खतांच्या किमतीत ६० टक्के वाढ
राजुरा बाजार : रासायनिक खतांच्या भावात ५८ ते ६० टक्के अशी भरमसाठ भाव वाढ झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या भाववाढीने आणखी एक झटका दिला आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला तोकडे भाव, नापिकीसह लॉकडाऊनने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने धक्का दिला आहे. शेतकरी आता शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. रासायनिक खते हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने अनेक कंपनीने एक पत्रक काढून नवे दर घोषित केले आहे. युरिया वगळता सर्वच संयुक्त खताची भरमसाठ म्हणजे ६० टक्क्यांनी भाव वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होईल. खते ही जुन्याच दराने विकली जातील, असेही खतांच्या कंपनीने स्पष्ट केले आहे. नवीन दर हे येणाऱ्या खरीप हंगामात लागू पडेल. अर्थात १ एप्रिलपासून हे नवे दर लागू असतील.
असे आहेत जुने दर
१५.१५.१५ : १०६० रुपये
१६.१६.१६ : १०७६ रुपये
डी ए पी : १२०० रुपये
२०.२०. ००.१३ : ९७५ रुपये
नवीन दर
१५.१५.१५ : १५०० रुपये
१६.१६.१६ : १५७५ रुपये
डी ए पी : १९०० रुपये
२०.२०. ००.१३ : १३५० रुपये
कोट
रासायनिक खतांच्या किमतीत किमान ६० टक्के भाव वाढ झाली. नवीन दराची खते बाजारात उपलब्ध झालेली आहे. खताचा स्टॉक करत असताना गुंतवणूकही वाढली.
- जितेंद्र शाह,
खत विक्रेता, वरूड
कोट २
एवढी महाग खते शेतकऱ्यांकडून खरेदी करणे शक्य होत नाही. त्या प्रमाणात शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला नाही. केंद्र सरकारने व रासायनिक खतांच्या कंपन्यांनी या भाववाढीबाबत फेरविचार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- जगदीश राऊत,
शेतकरी, चिंचरगव्हाण
--------------