शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील २६२६ गावांना यंदा पाणीटंचाईची झळ, ३५ तालुक्यांत कमी पावसाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 16:47 IST

पश्चिम विदर्भात यंदा ५६ पैकी ३५ तालुके पावसात माघारले. यवतमाळ जिल्ह्यात ६०.४ व वाशीम जिल्ह्यात ७५.६ टक्केच पावसाची नोंद झाल्याने भूजलाचे पुनर्भरण झालेले नाही.

- गजानन मोहोड

अमरावती - सरासरीपेक्षा दोन जिल्ह्यांत पर्जन्यमान कमी झाल्याने यंदा २ हजार २६ गावांमध्ये पाणीटंचाईची झळ जाणवणार असल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा अहवाल आहे. यासाठी ३ हजार ७३८ उपाययोजनांचा प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यावर ५०.३६ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.पश्चिम विदर्भात यंदा ५६ पैकी ३५ तालुके पावसात माघारले. यवतमाळ जिल्ह्यात ६०.४ व वाशीम जिल्ह्यात ७५.६ टक्केच पावसाची नोंद झाल्याने भूजलाचे पुनर्भरण झालेले नाही. परिणामी पाण्याचे उद्भव मार्चअखेर कोरडे पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाचही जिल्हा परिषदांद्वारा संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. तीन टप्प्यांतील आॅक्टोबर ते डिसेंबर दरम्यानचा टप्पा निरंक राहिला. यामध्ये ४७ गावांसाठी ३१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. यावर किमान ३.८५ कोटींंचा खर्च प्रस्तावित करण्यात आलेला आहे. विभागात मार्च अखेरपर्यंत १,०७० गावांमध्ये पाणीटंचाईची झळ बसणार आहे. याकरिता ८२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. यावर २९.५७ कोटींंचा खर्च प्रस्तावित आहे. पाणीटंचाईची खरी झळ एप्रिल जे जून या कालावधीत राहणार आहे. या कालावधीत विभागातील १,५०६ गावांना कोरड लागण्याची शक्यता आहे. यासाठी १,९५७ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात, यावर १६.९३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यंदा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या यंत्रणेद्वारा कृती आराखड्याला विलंब झालेला आहे. यासाठी विभागीय आयुक्तांना संबंधित जिल्हा परिषदांना पत्र द्यावे लागले.

 या प्रस्तावित उपाययोजना यंदा १८९ गावांमधील २५७ विहिरींचे खोलीकरण व गाळ काढण्यात येणार आहे. यासाठी ८२.२० लाखांचा खर्च येणार आहे. १,७५८ गावांमध्ये १,८८० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येईल. यासाठी ११.३४ कोटींचा खर्च येणार आहे. १७९ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. यासाठी ८.२३ कोटी, ३१९ नळयोजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी १५.६७ कोटी, ११७ गावांत २४५ नवीन विहिंरीसाठी ८.९९ कोटी व १०० गावांत तात्पुरत्या पूरक नळयोजनांसाठी ५.३कोटींचा निधी अपेक्षित आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAmravatiअमरावती