शहरातून ६ किलो ६८० गॅ्रम गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:27 IST2017-12-14T23:26:20+5:302017-12-14T23:27:32+5:30

6 kg 680 gram ganja seized in the city | शहरातून ६ किलो ६८० गॅ्रम गांजा जप्त

शहरातून ६ किलो ६८० गॅ्रम गांजा जप्त

ठळक मुद्देदोन ठिकाणी कारवाई - पोलीस उपायुक्तांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पोलिसांनी सापळा रचून शहरातील दोन ठिकाणाहून तब्बल ६ किलो ६८२० ग्रॅम गांजा जप्त केला. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात पोलिसांनी बुधवारी रात्री नागपुरी गेट हद्दीत तसेच छत्री तलाव ते दस्तुरनगर मार्गावर धाडसत्र राबविले.
पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, एपीआय पवार तसेच १७ पोलिसांच्या ताफ्याने हैदरपुºयातील जुगार अड्ड्यावर धाड टाकली. मात्र, जुगारी पसार झाल्याने पोलिसांच्या हाती काही लागले नाही. याचवेळी पोलिसांनी हैदरपुºयातील रजियाबी शेख हुसैन (६०) या महिलेच्या घरी धाड टाकली. पोलिसांनी महिलेस अटक करून ६९० ग्रॅम गांजा जप्त केला. नागपुरी गेट पोलिसांनी पुढील चौकशी सुरू करून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
नागपूरच्या आरोपीला अटक
अमरावती : गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक साबीर शेख यांच्या पोलीस पथकाने छत्री तलाव ते दस्तुरनगर दरम्यान सुपर एक्स्प्रेस हायवेवरील खदानीजवळ नाकाबंदी केली. यावेळी पळून जात असलेल्या आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. सुनील जयंतीलाल पोपट (५३,रा. एनआयटी कॉम्पलेक्स, नंदनवन, नागपूर) असे त्याचे नाव असून, त्याच्याजवळून ४१ हजार ९३० रुपये किमतीचा ५ किलो ९९० गॅॅ्रमचा गांजा जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम २०, २२, एनडीपीएस अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. प्रकरण राजापेठ पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

Web Title: 6 kg 680 gram ganja seized in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.