शेतकऱ्यांना अपघात विम्याचे ५८ लाख

By Admin | Updated: December 12, 2015 00:22 IST2015-12-12T00:22:07+5:302015-12-12T00:22:07+5:30

कृषी विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या शेतकरी जनता विमा योजनेत ४ डिसेंबरपर्यंत ६० प्रकरणंत दोन प्रस्ताव विमा कंपनीद्वारा नाकारण्यात आले होते.

58 lakhs of accident insurance for farmers | शेतकऱ्यांना अपघात विम्याचे ५८ लाख

शेतकऱ्यांना अपघात विम्याचे ५८ लाख

कृषी विभागाने राबविली योजना : २६ प्रस्ताव मंजूर, २२ प्रलंबित
अमरावती : कृषी विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या शेतकरी जनता विमा योजनेत ४ डिसेंबरपर्यंत ६० प्रकरणंत दोन प्रस्ताव विमा कंपनीद्वारा नाकारण्यात आले होते. पैकी २६ प्रस्ताव मंजूर असून २० प्रकरणे कंपनीकडे प्रलंबित आहे. अशा ५८ प्रकरणात शेतकऱ्यांना अपघात विम्यापोटी ५८ लाख मिळणार आहे.
कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्यावतीने शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात या योजनेअंतर्गत विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचा अपघात मृत्यू झाल्यास, अपघातात दोन्ही डोळेनिकामी झाल्यास किंवा एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपयांची विमा भरपाई कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळते. अमरावती विभागात अमरावती, मोर्शी व अचलपूर असे तीन उपविभाग आहेत.
अमरावती विभागात ४ डिसेंबर पर्यंत ३० प्रकरणे दाखल करण्यात आली. या पैकी ११ प्रस्ताव कंपनीद्वारा मंजूर करण्यात आले. ५ प्रस्ताव कंपनीकडे प्रलंबित आहे तर १४ प्रस्ताव त्रुटी अभावी प्रलंबित आहे.
मोर्शी उपविभागात २३ प्रकरणे दाखल करण्यात आली. यापैकी १२ प्रस्ताव कंपनीकडू मंजूर करण्यात आलीत. अद्याप १० प्रकरणे त्रुटी अभावी प्रलंबित आहे. अचलपूर उपविभागात अपघात विम्याची ७ प्रकरणे दाखल करण्यात आलीत या पैकी ३ प्रस्ताव विमा कंपनीद्वारा मंजूर करण्यात आले आहे. १ प्रस्ताव नामंजूर व ३ प्रस्ताव चौकसीसाठी प्रलंबित आहेत. शासनाच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र काही अटी शिथिल कराव्या, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)

अशी आहे शेतकरी जनता विमा योजना
शेती व्यवसाय करताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात/ बीज पडणे/ शॉक लागणे, पूर , सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू होतो. अनेकदा कायमस्वरुपी अपंगत्व येते. या परिवाराला उदरनिर्वाहासाठी आर्थिक लाभ मिळावा यासाठी आॅगस्ट २०१४ मध्ये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. याच योजनेला २००९-१० मध्ये शेतकरी जनता अपघात विमा योजना, असे नाव देण्यात आले आहे.

Web Title: 58 lakhs of accident insurance for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.