चांदूरबाजार तालुक्यात ५७ उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:10 IST2020-12-26T04:10:57+5:302020-12-26T04:10:57+5:30
चांदूर बाजार : तालुक्यात १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या ४१ ग्रामपंचायतींंसाठी एकूण ५७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ...

चांदूरबाजार तालुक्यात ५७ उमेदवारी अर्ज दाखल
चांदूर बाजार : तालुक्यात १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या ४१ ग्रामपंचायतींंसाठी एकूण ५७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. गुरुवारी सर्वाधिक उमेदवारी अर्ज जवळा शहापूर ग्रामपंचायतसाठी दाखल करण्यात आले आहे. पहिल्या दिवशीही याच ग्रांमपंचायतींसाठी चार नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. तालुक्यात दोन दिवसांत एकूण ६२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
दुसऱ्या दिवशी नामांकन अर्ज दाखल करताना काही उमेदवारांसोबत २५ ते ३० कार्यकर्त्यांचा जत्था होता. उमेदवार फक्त एक, त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांची संख्या मात्र अधिक. असे चित्र दिसून आले. यावेळी अशा कार्यकर्त्यांकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात सेल्फीचाही सोहळा साजरा करण्यात आला. तसेच उत्साहाच्या भरात उमेदवारी अर्ज दाखल करतानाच पेढेही वाटप करण्यात आले. अशा हौशी लोकांमुळे अन्य लोकांना मात्र विनाकारण ताटकळत उभे राहावे लागले. हा प्रकार स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ थांबविणे गरजेचे आहे.
-------------------