शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

५५ लाखांचा गांजा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 11:33 PM

नागपूर-मुंबई हायवे क्रमांक ६ वरील लोणी टाकळीजवळ स्थानिक गुन्हे शाखा व लोणी पोलिसांनी एका ट्रकमधून बुधवारी सकाळी तब्बल ५५ लाखांचा गांजा जप्त केला. विशेष म्हणजे, अंमली पदार्थ विरोधीदिनीच ही कारवाई करण्यात आली. केळीने भरलेल्या ट्रकमधून गांजाची तस्करी केली जात होती. पोलिसांनी ट्रक पकडताच चालक व एका इसमाने तेथून पलायन केले. पोलिसांनी १० क्विटंल गांजा, ट्रक व इतर साहित्य असता एकूण ७२ लाखांचा माल जप्त केला आहे.

ठळक मुद्देअमली पदार्थ विरोधीदिनी कारवाई : केळीच्या ट्रकमधून गांजाची वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/बडनेरा : नागपूर-मुंबई हायवे क्रमांक ६ वरील लोणी टाकळीजवळ स्थानिक गुन्हे शाखा व लोणी पोलिसांनी एका ट्रकमधून बुधवारी सकाळी तब्बल ५५ लाखांचा गांजा जप्त केला. विशेष म्हणजे, अंमली पदार्थ विरोधीदिनीच ही कारवाई करण्यात आली. केळीने भरलेल्या ट्रकमधून गांजाची तस्करी केली जात होती. पोलिसांनी ट्रक पकडताच चालक व एका इसमाने तेथून पलायन केले. पोलिसांनी १० क्विटंल गांजा, ट्रक व इतर साहित्य असता एकूण ७२ लाखांचा माल जप्त केला आहे.पोलीस सूत्रानुसार, गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा व लोणी पोलिसांनी नागपूर-मुंबई महामार्ग क्रमांक ६ च्या लोणी टाकळीजवळील साई रिसोर्टसमोर नाकाबंदी केली. पोलिसांनी ट्रक क्रमांक एचआर ४६ सी-१६५७ ला थांबविले. यावेळी ट्रकचालक व सोबत असलेला एक इसम पळून गेला. पोलिसांनी ट्रकमधून समाधान शंकर हिरे (रा. जळगाव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ट्रकमधील केळीचा माल आंध्र प्रदेशातून उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे नेला जात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.पोलिसांनी ट्रकची बारकाईने पाहणी करून ट्रकमधील केळीच्या काही माल बाहेर काढला असता, खालच्या भागात पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या ३५ पोते आढळून आले. त्या पोत्यांची तपासणी केल्यानंतर त्यात तब्बल १० क्विंटल गांजाचा माल असल्याचे दिसले.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन ट्रकसह गांजाचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यातील पसार आरोपीच्या शोधात पोलीस पथके रवाना झाली आहेत.केळीच्या आड गांजाची तस्करीपोलीस चौकशीत हा ट्रक पन्नालाल सनउ बासदेव (रा. रोहतक, हरियाणा) याच्या मालकीचा असल्याचे निदर्शनास आले. ट्रकमध्ये गव्हाचा माल भरून चालक हरियाणा येथून आंध्र प्रदेशात गेला होता. त्याच ट्रकमध्ये केळी भरून तो माल वाराणसीला घेऊन जात असताना केळीखाली लपवून ठेवलेल्या गांजाच्या तस्करीचा भंडाफोड झाला.यांनी केली ही धडाकेबाज कारवाईगांजा तस्करीची गोपनीय माहिती मिळताच पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश पालवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल किनगे, सचिंद्र शिंदे, लोणीचे ठाणेदार एस.एस. अहिरकर, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, विशाल हिवरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक वासुदेव नागलकर, पोलीस हवालदार शकुर शेख, इंगळे, भारत देशकरी, बाबू रंगे, गजानन म्हस्के, प्रकाश किल्लेदार, सुनिल निर्मळ, वीरेंद्र तराळे, दिनेश कनोजिया, भागवत नागरगोजे, मोहन ठाणेकर, अमोल घोडे, चालक एएसआय शिवदास, पोलीस हवालदार अरविंद लोहकरे, नितेश तेलगोटे यांनी लोणी टाकळी हद्दीत सापळा रचून गांजा तस्करीचा पदार्फाश केला.