५४९ तळीरामांची घरपोच दारूसाठी ऑनलाईन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:01 IST2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:01:23+5:30

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शासनादेशानुसार शहरातही घरपोच दारू सुविधा या ऑनलाईन उपक्रमाला मान्यता दिली. एक्साईकडून अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. सोमवारी सहा वाईन शॉप आणि एका बिअर शॉपीतून ५४९ जणांनी दारूसाठी ऑनलाईन बुकींग केली. ही बुकींग सकाळी १० ते दुपारी ३ वाजता दरम्यान करण्यात आली.

549 Taliram's online registration for home brewing | ५४९ तळीरामांची घरपोच दारूसाठी ऑनलाईन नोंदणी

५४९ तळीरामांची घरपोच दारूसाठी ऑनलाईन नोंदणी

ठळक मुद्देथेट विक्री नाही : आजपासून ३४ दुकानांतून सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात सात दुकानांतून सोमवारपासून घरपोच दारू सुविधा सुरू झाली. पहिल्याच दिवशी ५४९ तळीरामांनी दारूसाठी ऑनलाईन नोंदणी केल्याची माहिती आहे. केवळ दारू पिण्याचा परवाना असलेल्यांनाच घरपोच दारू मिळाली, हे विशेष. मंगळवारपासून १८ वाईन शॉप, १६ बिअर शॉपीतून ऑनलाईन नोंदणीअंती घरपोच दारू मिळविता येणार आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शासनादेशानुसार शहरातही घरपोच दारू सुविधा या ऑनलाईन उपक्रमाला मान्यता दिली. एक्साईकडून अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. सोमवारी सहा वाईन शॉप आणि एका बिअर शॉपीतून ५४९ जणांनी दारूसाठी ऑनलाईन बुकींग केली. ही बुकींग सकाळी १० ते दुपारी ३ वाजता दरम्यान करण्यात आली. बडनेरा शहरात एकमात्र वाईन शॉपी सुरू असल्याने दारू घेण्यायासाठी चिक्कार गर्दी झाली होती. मात्र, वाईन संचालकांनी थेट दारू मिळणार नाही, सोशल मीडियावर बुकींग करूनच दारू घरपोच मिळेल, असे फलक लावले होते. स्थानिक नवाथेनगर, दसरा मैदानसमोर, रूक्मिणीनगर, राजापेठ, दस्तुरनगर, कंवरनगर, चैतन्य कॉलनी येथील दारू दुकानांसमोर थेट दारू विकत घेण्यासाठी तळीरामांनी गर्दी केली होती. एक दिवस दारू पिण्याच्या परवान्यासाठी ५ रुपये शुल्क आकारले जात आहे. सोमवारी ५१० जणांनी दारु पिण्यासाठीचे आॅनलाईन परवाने मिळविले आहेत.

परवान्याशिवाय घरपोच दारू नाही
अमरावती व बडनेरा शहरात १८ वाईन आणि १६ बिअर शॉपीमधून ऑनलाईन दारू बुकींग करता येणार आहे. दारू विक्री दुकांनाबाहेर ठळक अक्षरात व्हॉट्सअप, भ्रमणध्वनी, मॅसेज आणि फोन नंबर संपर्कासाठी आहेत. तळीरामांना या क्रमांकावर संपर्क साधून दारू बुकींग करावी लागेल. त्यानंतर डिलेव्हरी बॉय घरपोच दारू आणून देणार आहे. त्याकरिता दारू पिण्याचा परवाना आवश्यक असणार आहे. परवान्याशिवाय घरपोच दारू मिळणार नाही, असे एक्साईजचे अधीक्षक राजेश कावळे म्हणाले.

Web Title: 549 Taliram's online registration for home brewing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.