शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘जुन्या पेन्शन’साठी आवाज बुलंद, ५४ हजार सरकारी कर्मचाऱ्यांचे कामबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 15:39 IST

बेमुदत संप सुरु, शासकीय कामकाज प्रभावित, जिल्हाधिकारी कार्यालय चौकात संघटनांचे धरणे 

 गजानन मोहोड

अमरावती : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी आवाज बुलंद करीत मंगळवारपासून बेमुदत संप पुकारल्याने शासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. संपात सहभागी सर्व शासकीय कर्मचारी संघटनांनी येथील जिल्हाधिकारी चौकात धरणे दिले. मागण्या मान्य होईस्तोवर आता माघार नाही, असा निर्धार येथे व्यक्त करण्यात आला.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी आता ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’, या प्रमुख मागणीसह कंत्राटी, रोजंदारी व बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, रिक्त पदे तातडीने भरा, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, वाहनचालकांची पदे निरसित करु नका, यासह अन्य मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी शासनाला अल्टिमेटम दिला होता, मात्र, शासनाद्वारा सकारात्मक प्रतिसाद नसल्याने मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. 

या कर्मचारी संपाचा फटका सर्वाधिक सर्वसामान्य नागरिकाला बसला आहे. त्यांची कामे रखडली आहेत. कामानिमित्त शासकीय कार्यालयात आलेल्या अनेक नागरिकांना कामाशिवाय परतावे लागले आहे. याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालयातील आरोग्य सेवादेखील काही प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनStrikeसंपEmployeeकर्मचारीAmravatiअमरावती