जिल्ह्यातील ५३१ कोरोनायोद्धा वेतनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:12 IST2021-06-02T04:12:01+5:302021-06-02T04:12:01+5:30
आरोग्य कर्मचाऱ्यांची मागणी जिल्ह्यातील ५३१ कोरोना योद्धा वेतनापासून वंचित सन्मान सोबत वेतन मिळणार कधी आरोग्य कर्मचाऱ्यांची मागणी ...

जिल्ह्यातील ५३१ कोरोनायोद्धा वेतनापासून वंचित
आरोग्य कर्मचाऱ्यांची मागणी
जिल्ह्यातील ५३१ कोरोना योद्धा वेतनापासून वंचित
सन्मान सोबत वेतन मिळणार कधी
आरोग्य कर्मचाऱ्यांची मागणी
धामणगाव रेल्वे : स्वतःच्या जिवाची व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता कोरोनाशी चोवीस तास झुंज देणाऱ्या जिल्ह्यातील ५३१ आरोग्य कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नाही. सन्मान, फुलांच्या वर्षावापेक्षा आम्हाला नुसती पाकळी हाती द्या, पण सोबत वेतन द्या, अशी मागणी जिल्ह्यातील या कोरोनायोद्ध्यांनी केली आहे.
अमरावती जिल्ह्यात आरोग्य विस्तार अधिकारी ३३, आरोग्य सहायिका ६३, आरोग्य सहायक १०२, आरोग्य सेविका ३००, आरोग्य सेवक २३१, पट्टीबंधक १३, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ११, औषधनिर्माता अधिकारी ७८ असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत कर्मचारी आहेत. मागील तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही. दिवसभर हे कर्मचारी लसीकरण गावागावांत जाऊन कोरोना तपासणी शिबिरे घेत आहेत. या कर्मचाऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हे दरमहा मिळणारे वेतन आहे. वेतन जर उशिराने होत असेल, तर प्रपंच कसा चालवायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद व अन्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वेळेवर वेतन मिळते, आरोग्य विभागावर अन्याय का, असा प्रश्नही या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
विमा, गृहकर्ज, मुलांचे शैक्षणिक शुल्क, औषधोपचार, घरभाडे, किराणा, दूध यासाठी महिन्याला खर्च करावा लागतो. शासन आणि प्रशासन आरोग्य कर्मचारी वर्गाकडून केवळ कामाची अपेक्षा ठेवते. मात्र, वेतन वेळेवर देत नाही. आमच्यासाठी फुले उधळू नका, मात्र वेतन वेळेवर मिळायला हवे, अशी जिल्ह्यातील या आरोग्य कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे.
-----------------------
दोन वर्षांपासून आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस अथक परिश्रम घेत आहेत. आजपर्यंत अनेक आरोग्य कर्मचारी कोरोनाने दगावले. आम्ही चोख सेवा देत असतानाही वेळेवर वेतन मिळत नाही. अशाने आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा?
- मनोज सरदार, जिल्हा संघटक, राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटना, अमरावती