पंचायत समित्या बांधकामांसाठी जिल्ह्याला पावणेतीन कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST2021-03-05T04:13:38+5:302021-03-05T04:13:38+5:30

अमरावती : जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या बांधकाम, उपकामे व फर्निचरसाठी शासनाकडून सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला ...

53 crore for construction of Panchayat Samiti in the district | पंचायत समित्या बांधकामांसाठी जिल्ह्याला पावणेतीन कोटी

पंचायत समित्या बांधकामांसाठी जिल्ह्याला पावणेतीन कोटी

अमरावती : जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या बांधकाम, उपकामे व फर्निचरसाठी शासनाकडून सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यात रस्ते, इमारती आदी पायाभूत सुविधांची अनेक कामे सुरू असून, आणखीही आवश्यक कामे नव्याने हाती घेण्यात येतील. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

रस्ते, सार्वजनिक इमारती, पाणीपुरवठा व विविध पायाभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्यासाठी जिल्ह्यात निधीची कमतरता पडू देणार नाही. जिल्ह्यातील अपूर्ण कामे पूर्णत्वास नेण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा होत आहे. केवळ नागरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागात

पंचायत समितीच्या इमारती व उपकामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. प्रशासनानेही प्रक्रियेला गती देत विहित मुदतीत कामे पूर्ण करावी. कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावीत. यानंतरही इतर आवश्यक कामांबाबत वेळोवेळी आढावा घेऊन वेळेत प्रस्ताव द्यावेत, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत

बॉक्स

या तालुक्यांना मिळाला निधी

शासनाकडून तिवसा पंचायत समितीच्या इमारतीसंबंधी आवश्यक उर्वरित कामांसाठी १४ लाख, मोर्शी पं. स. साठी ७५.५७ लाख, अंजनगाव सुर्जी पं. स. साठी ९५ लाख, नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीच्या उपकामांसाठी २० लाख व फर्निचरसाठी २५ लाख, तसेच चांदूर बाजार पं. स.च्या उपकामांसाठी ४५ लाख रूपये निधी वितरित केला आहे. तसा शासन निर्णय ग्रामविकास विभागाकडून निर्गमित झाला आहे.

Web Title: 53 crore for construction of Panchayat Samiti in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.