५,२६७ घरकुले पूर्ण करण्यासाठी कसरत

By Admin | Updated: February 8, 2016 00:21 IST2016-02-08T00:21:44+5:302016-02-08T00:21:44+5:30

इंदिरा आवास योजनेंतर्गत मार्चपासून अनुदानाचे धनादेश वितरण बंद होणार असल्याने जिल्ह्यात अपूर्ण ५ हजार २६७ घरकुले पूर्ण करण्यासाठी ...

5,267 exercises to complete the house | ५,२६७ घरकुले पूर्ण करण्यासाठी कसरत

५,२६७ घरकुले पूर्ण करण्यासाठी कसरत

३१ मार्चची डेडलाईन : अन्यथा अखर्चित निधी शासन तिजोरीत जमा होणार
जितेंद्र दखने अमरावती
इंदिरा आवास योजनेंतर्गत मार्चपासून अनुदानाचे धनादेश वितरण बंद होणार असल्याने जिल्ह्यात अपूर्ण ५ हजार २६७ घरकुले पूर्ण करण्यासाठी यंत्रणेला दोन महिने जीवापाड कसरत करावी लागेल त्यासाठी विशेष पथकाची स्थापना झाली असून शिबिर, मेळावे सुसंवादाच्या उपक्रमातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनासह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने केले आहे.
मार्च अखेर जिल्हा तालुका ग्रामस्तरावरील सर्व बँका खाती गोठवली जातील. त्यातील अखर्चीत निधी राज्यस्तरावरील मध्यवर्ती बँक खात्यात जमा होईलनंतर या खात्यातून घरकुल यादीचा निधी थेट गटविकास अधिकाऱ्यांमार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग होईल यामुळे मार्चपर्यंत जिल्ह्यातील अपूर्ण घरकुलांची कामे पूर्ण करण्याची सूचना ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दिव्यांची माहिती सूत्रांनी दिली.
शौचालयाची कामे पूर्ण करा
घरकुलांची कामे झाली. मात्र शौचालयांचे बांधकाम अपूर्ण असल्याची नोंद असल्याने याजनेवर परिणाम होत आहे.या संदर्भात ही बांधकामे पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बैठकीव्दारे सूचना द्यावी. वाढीव अनुदान मागणीचा अहवाल तयार करावा तसेच घरकुलांचा पहिला हप्ता वितरीत झाल्यानंतर लाभार्थ्यांकडे स्थलांतर अथवा परागंदा लाभार्थ्यांमुळे अपूर्ण घरुलांच्या अखर्चीत निधीची माहिती शासनाने मागविली आहे.


अपूर्ण घरकुलांची स्थिती

जिल्ह्यात २०१२-२०१३ या कालावधीत ४० पुढील वर्षातील १५९ आणि २०१४-१५ या कालावधीतील ५०६८ घरकुले अपूर्ण आहेत. अशी एकूण ५२६७ हजार आणि चालू वर्षातील मिळून सरासरी सुमारे ५ हजार २६७ घरकुलाची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेत सरासरी ७० टक्के लाभार्थ्यांना निधीचा दुसरा हप्ता घेतलेला नाही तसेच विविध अडचणी व कारणांमुळे घरकुलांचे काम अपूर्ण राहिले आहे ते तडीस नेण्यासाठी विशेष पथकातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत स्तरावर शिबिर मेळावे घेतील. त्यांना मार्चनंतर अनुदानातील धनादेश वितरण प्रणाली बंद होवून थेट बँक खात्यात निधी वर्ग होण्याची योजनाही समजावून सांगितली.

ग्रामपंचायतींना सूचना
इंदिरा आवास योजनेंतर्गत ग्रामपंचायतीकडील अखर्चीत निधी पंचायत समितीकडे तत्काळ जमा करण्याची सूचना आहे. तसेच २०१४-१५ मध्ये विशेष घटक योजनेचा राज्य आर्थिक हिस्सा कमी मिळाल्याने लाभार्थ्यांना अनुदानाचा हप्ता देता न आल्याने घरकुलांची कामे अपूर्ण राहिल्याची कबुली शासनाने परीपत्रकाव्दारे दिली आहे.

अपूर्ण असलेली घरकुले व शौचालयाची कामे तसेच मंजूर पण सुरू न झालेली कामे त्वरित मार्गी लावण्याचे सूचना सर्व बिडीओंना दिल्या आहेत. मार्चपर्यंत कामे संपूर्ण घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल.
- प्रमोद कापडे,
प्रकल्प संचालक, डीआरडीए

Web Title: 5,267 exercises to complete the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.