५२५ तलाठी साझांची पुनर्रचना

By Admin | Updated: August 27, 2014 23:12 IST2014-08-27T23:12:42+5:302014-08-27T23:12:42+5:30

जिल्ह्यातील महसूल विभागात महसूल विभागाचा मुख्य घटक असलेल्या तलाठ्याची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे तलाठ्यावर अतिक्ति कामाचा भार येत आहे. यामुळे शासकीय कामेही प्रभावित होत आहे

525 Reconstruction of Talathi Saga | ५२५ तलाठी साझांची पुनर्रचना

५२५ तलाठी साझांची पुनर्रचना

अमरावती : जिल्ह्यातील महसूल विभागात महसूल विभागाचा मुख्य घटक असलेल्या तलाठ्याची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे तलाठ्यावर अतिक्ति कामाचा भार येत आहे. यामुळे शासकीय कामेही प्रभावित होत आहे. या पार्श्वभूमीवर तलाठी साझाची पुनर्रचना करण्याचा निर्णय महसूल विभागाच्या विभागीय आयुक्तांच्या नुकत्याच पार पडलेल्या मुंबईतील बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यातील सुमारे ५२५ तलाठी साझांची संख्या वाढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
शासन व प्रशासन आणि सामान्य जनतेमधील महत्त्वाचा दुवा म्हणून तलाठ्यांची जबाबदारी पार पाडतात. आवश्यक दस्ताऐवज देणे, शेतीचे फेरफार, शेतसारा वसुली आणि अन्य प्रकारची कामे त्यांच्याकडे आहेत. नैसर्गिक, आपत्तीच्या कालावधीत सर्वेक्षण व पंचनाम्याचे कामही तलाठ्यांना दिले जाते. मात्र महसूल यंत्रणेत तलाठ्याची अपूर्ण असलेली पदे लक्षात घेऊन त्यांच्याकडे कामांचा अतिरिक्त भार सांभाळावा लागत आहे. या प्रकाराने प्रशासकीय कामेही रखडून पडतात. अमरावती जिल्ह्यात सहा. महसूल उपविभागात सुमारे ५२५ तलाठी कार्यरत आहेत. मात्र यापैकी १० पदे रिक्त असून काही तलाठी निलंबित आहे. त्यामुळे इतर तलाठ्यावर अतिरिक्त कामांचा भार देण्यात आला आहे. अशात नवनवीन बदल, नवीन जिल्ह्याची महसूल उपविभागाची निर्मिती होत आहे. मात्र तलाठ्यांची पदे वाढली नाहीत. वाढत्या कामाच्या व्यापामुळे जिल्ह्यासह राज्यातील तलाठ्यांची रिक्त पदे भरावी, अशी मागणी शासन दरबारी वारंवार होत आहे. मात्र तरीही यावर निर्णय होत नव्हता. अखेर ४० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता तलाठी साझांच्या पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यात ५२५ तलाठी पदामध्ये भर पडणार असून महसूलची कामेही वेळेत होण्यास या निर्णयाची मदत होणार आहे.
याबाबतचे धोरण वरिष्ठ पातळीवर ठरले आहे. मात्र याची अंमलबजावणी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या नसल्याने याला आता याचा मुहूर्त केव्हा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 525 Reconstruction of Talathi Saga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.