ऋणमोचनात गाडगेबाबांचा ५२ फुटांचा पुतळा
By Admin | Updated: June 27, 2016 00:05 IST2016-06-27T00:05:42+5:302016-06-27T00:05:42+5:30
वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या ऋणमोचन येथे संत गाडगेबाबा यांचा ५२ फूट उंचीचा पूर्णाकृती उभारला जाणार आहे.

ऋणमोचनात गाडगेबाबांचा ५२ फुटांचा पुतळा
राणांकडून वर्षभराचे मानधन : पाच कोटींतून ऋणमोचनचा विकास
अमरावती : वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या ऋणमोचन येथे संत गाडगेबाबा यांचा ५२ फूट उंचीचा पूर्णाकृती उभारला जाणार आहे. त्याकरिता आ. रवि राणा यांनी वर्षभराचे मानधन देण्याचा निर्णय घेतला असून पाच कोटी रुपये खर्चून या गावचा विकास केला जाईल, असे आ. राणा यांनी जाहीर केले.
बडनेरा मतदार संघातील ऋणमोचन, नांदेडा, जसापूर व समरसपूर ही चार गावे खासदार आदर्श ग्राम योजनेतून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दत्तक घेतली आहेत. ना. गोयल यांच्या निधीतून नांदेडा येथे निर्माण करण्यात आलेल्या सभागृहाअचे लोकार्पण निश्चित करण्यात आले होते. मात्र ना. गोयल हे कार्यक्रमाला काही तांत्रिक अडचणींमुळे येऊ शकले नाहीत. ना. गोयल येणार असल्याने गावकरी त्यांच्या स्वागतासाठी उत्सूक होते. परंतु ते पोहचले नाहीत. अखेर गावकरांच्या उपस्थितीत आ.राणांनी सभागृह, जलशुद्धिकरण केंद्राचे उद्घाटन करून अंगणवाडी, शाळेत भेटी देऊन कामांची पाहणी केली. ऋणमोचन हे संत गाडगेबाबांची कर्मभूमी या गावी गाडगेबाबांचा ५२ फुटांचा पुतळा उभारण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे जाहीर केले. तसेच आ. राणांनी वर्षभराचे मानधन देण्याची तयारी देखील दर्शविली. ना. पीयूष गोयल यांना सुद्धा पत्र पाठवून ऋणमोचन येथे संत गाडगेबाबांचा पुतळा उभारण्यासाठी मानधन द्यावे, असे कळविले आहे. ऋणमोचन येथे पाच कोटी रुपयांतून पूल, घाटाचे बांधकाम, सौदर्यीकरण, कीर्तन हॉल, ग्राम संकूल आदी कामे साकारले जातील. ऋणमोचन येथे ५२ फुटांचा पुतळा साकारण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे आ.राणांनी सांगितले. (प्रतिनिधी)