वरूडमध्ये मोबाईल शॉपीतून ५१ स्मार्ट फोनची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:16 IST2021-09-14T04:16:43+5:302021-09-14T04:16:43+5:30
वरूड : स्थानिक महात्मा फुले चौकाजवळच्या मोबाइल दुकानामधून चोरट्यांनी ५१ स्मार्ट फोन चोरून नेल्याची घटना रविवारच्या पहाटे घडली. पोलिसांनी ...

वरूडमध्ये मोबाईल शॉपीतून ५१ स्मार्ट फोनची चोरी
वरूड : स्थानिक महात्मा फुले चौकाजवळच्या मोबाइल दुकानामधून चोरट्यांनी ५१ स्मार्ट फोन चोरून नेल्याची घटना रविवारच्या पहाटे घडली. पोलिसांनी तपासचक्रे फिरवून एकाला अटक करून १७ स्मार्ट फोन जप्त केले, तर दुसरा आरोपी पसार झाला आहे. चोरट्यांनी शटर वाकवून ५ लाख २९ हजर रुपयांचे फोन चोरून नेले.
पोलीस सूत्रांनुसार, देवा पोहरकर (रा. आठवडी बाजार, वरूड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दुकानदार मुकेश देशमुख हे रविवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा ही चोरी उघड झाली. फिर्यादीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. देवा नामक युवकाकडून १७ स्मार्टफोन जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ४५७ , ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा साळुंकेसह वरुड पोलीस करीत आहेत.