शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

१.८५ लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 12:51 IST

Amaravati : सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गतवर्षीच्या कपाशी सोयाबीनला भाव न मिळाल्याने भावांतर योजनेच्या माध्यमातून हेक्टरी पाच हजार व दोन हेक्टर मर्यादेत अनुदान दिले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,८४,५४४ शेतकऱ्यांनी कृषी सहायकाकडे ई-केवायसी केली असल्याने त्यांच्या खात्यात पेरणी क्षेत्राच्या अनुषंगाने अर्थसाहाय जमा होत आहे. त्यामुळे सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मागच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाने सरासरी उत्पन्नात कमी आली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे शेतमालास हमीभावदेखील मिळाला नाही. त्यामुळे राज्य शासनाने भावांतर योजनेच्या माध्यमातून दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी पाच हजार देण्याची घोषणा केली होती, त्याची अंमलबजावणी दोन दिवसांपासून सुरू झालेली आहे. गतवर्षी ई-पीक पाहणी केलेल्या ३,५३,६८३ शेतकऱ्यांच्या याद्या जमाबंदी विभागाने कृषी विभागाला पुरविल्या होत्या व यामध्ये नावे असलेल्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सध्या जिल्ह्यात सुरू आहे. शासनाद्वारा २९ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात अर्थसाहाय्य जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया ३० पासून सुरू झाली आहे. अद्याप ४६,२४६ शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया केली नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली. 

याद्या प्राप्त शेतकरी : ३,५३,६८३ कपाशीकरिता टार्गेट : १,५२,३४२ सोयाबीनसाठी टार्गेट : २,०१,३४१ आतापर्यंत केवायसी : १,८४,५४४ ई-केवायसी प्रलंबित : ४६.२४६

अर्थसाहाय मिळालेले तालुकानिहाय शेतकरी अचलपूर १०,६५३, अमरावती २२,८६४, अंजनगाव सुर्जी १६,२४६, भातकुली १४,४०५, चांदूर रेल्वे १३,०८१, चांदूर बाजार १४,८१६, चिखलदरा ४,९०१, दर्यापूर १९,८७५, धामणगाव रेल्वे १२,३४४, धारणी ६,६४४, मोर्शी १५,९६६, नांदगाव खंडेश्वर १९,८७२, तिवसा १३,३६५, व वरूड तालुक्यात ९५१२ शेतकऱ्यांना अर्थसाहाय मिळण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे.

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती