चांदूररेल्वेत ५0 वर्षांपूर्वीचे झाड कोसळले
By Admin | Updated: May 15, 2014 02:13 IST2014-05-15T00:52:25+5:302014-05-15T02:13:37+5:30
येथील कन्या शाळेसमोरील सुमारे ५० वर्षांपूर्वीचे निंबाचे झाड बुधवारी अचानक कोसळले.

चांदूररेल्वेत ५0 वर्षांपूर्वीचे झाड कोसळले
मुलगी जखमी, वाहतूक कोलमडली
चांदूररेल्वे : येथील कन्या शाळेसमोरील सुमारे ५० वर्षांपूर्वीचे निंबाचे झाड बुधवारी अचानक कोसळले. तीन दुचाकी, दोन सायकली झाडाखाली दबल्याने नुकसान झाले तर १४ वर्षीय मुलगी सुदैवाने बचावली. ही घटना बुधवारी दुपारी ३.४५ वाजता घडली. स्थानिक चांदूररेल्वे कन्या शाळेसमोर निंबाचे मोठे झाड आहे.
या बाजूलाच नगरपरिषदेचे व्यापारी संकुल आहे. बुधवारी दुपारी अचानक हे झाड कोसळल्याने त्याखाली पाच वाहने दबल्याने नुकसान झाले. येथेच असलेल्या १४ वर्षीय अल्फीया शे. मुख्त्यार ही जखमी झाली. तिचा हाताला इजा पोहोचली. तसेच झाड रस्त्यावर कोसळल्याने एका बाजूची वाहतूकही विस्कळीत झाली होती. वीज तारा तुटल्याने विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे. नगरपरिषदेने हे झाड रस्त्याच्या बाजुला करण्याचे काम सुरु केले आहे. (तालुका प्रतिनिधी)