वर्षभरात ५० वाघांचा मृत्यू

By Admin | Updated: November 4, 2014 22:32 IST2014-11-04T22:32:56+5:302014-11-04T22:32:56+5:30

वाघांची शिकार आणि अवयवांच्या तस्करीच्या वाढत्या घटनांनी देशातील व्याघ्र संरक्षणाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. देशात वर्षभरात ५० वाघांचा बळी गेला आहे. ९ घटनांमध्ये वाघांच्या कातडीसह

50 tigers death annually | वर्षभरात ५० वाघांचा मृत्यू

वर्षभरात ५० वाघांचा मृत्यू

महाराष्ट्रातील चार वाघांचा समावेश : नऊ घटनांत कातडी जप्त
सुरेश सवळे - चांदूरबाजार
वाघांची शिकार आणि अवयवांच्या तस्करीच्या वाढत्या घटनांनी देशातील व्याघ्र संरक्षणाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. देशात वर्षभरात ५० वाघांचा बळी गेला आहे. ९ घटनांमध्ये वाघांच्या कातडीसह इतर अवयव जप्त करण्यात आले. त्यातील तीन घटना महाराष्ट्रातील आहेत.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) आकडे वारीनुसार २०१४ मध्ये आॅक्टोबर अखेरपर्यंत ५० वाघांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. सर्वाधिक १२ वाघांचा मृत्यू मध्यप्रदेशात झाला आहे. त्या खालोखाल तामिळनाडूत ९, उत्तराखंडमध्ये ६, आसाममध्ये ५, महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये प्रत्येकी ४ वाघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात वर्षभरात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रायपूर रेंजमध्ये एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. हे प्रकरण तपासात आहे.
२४ जून आणि १९ जुलै रोजी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात दोन वाघांचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी उमरेड-करांडला अभयारण्यात एका वाघाचे अस्तित्व संपुष्टात आले. कर्नाटकमधील सर्वाधिक १५ आणि महाराष्ट्रातील १० वाघांची संख्या घटली. वाघांची शिकार आणि कातडीसह अवयवांची तस्करी ही गंभीर समस्या बनली आहे.
यावर्षी राज्यात आतापर्यंत तीन ठिकाणांहून वाघांची कातडी जप्त करण्यात आली. १३ आणि १७ मार्च रोजी सांगली जिल्ह्यातून, २७ जुलैला भंडारा जिल्ह्यातून ही कातडी जप्त करण्यात आली. वाघांची शिकार करुन कातडी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकण्याचा व्यवसाय चांगलाच बहरला आहे. स्थानिकांना वाघाच्या कातडीची किंमत दहा-वीस हजार रुपये मिळालग तरीही पुरेशी असते. पण आंरराष्ट्रीय बाजारपेठेत याच कातडीची मोठी रक्कम मिळू शकते. त्यामुळेच बडे तस्कर या व्यवसायात गुंतले आहेत. चीन हा वाघांच्या अवयवांचा प्रमुख खरेदीदार देश आहे. कातडी ही वैभवाचे चिन्ह म्हणून तर इतर अवयव हे औषधी गुणधर्मासाठी खरेदी केले जातात, असे एका वरिष्ठ वनाधिकाऱ्याने सांगितले. कायद्याचे उल्लंघन करुन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाघ आणि इतर वन्यप्राण्यांच्या अवयवांना भरपूर मागणी आणि प्रचंड पैसा मिळत असल्याने वन्य प्राण्यांची सर्रास शिकार होत आहे.
वन विभागाच्यावतीने शिकारीच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ज्या ५० वाघांचा आतापर्यंत मृत्यू झाला त्यापैकी ४ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे व्याघ्र संवर्धन प्राधिकरण अहवालात म्हटले आहे.

Web Title: 50 tigers death annually

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.