जिल्ह्यात ५० एस.टी बसेस धावणार इलेक्ट्रिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:16 IST2021-08-29T04:16:07+5:302021-08-29T04:16:07+5:30

जितेंद्र दखने अमरावती : डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यासाठी महामंडळाने ...

50 ST buses will run on electric in the district | जिल्ह्यात ५० एस.टी बसेस धावणार इलेक्ट्रिकवर

जिल्ह्यात ५० एस.टी बसेस धावणार इलेक्ट्रिकवर

जितेंद्र दखने

अमरावती : डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यासाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. अमरावती विभागानेही महामंडळाकडे ५० बसेसची मागणी केल्याने लवकरच जिलह्यात पर्यावरणपूरक बसेस मिळण्याची शक्यता असून, याकरिता जिल्ह्यात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले. त्याचा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. अद्यापही कोरोना संसर्ग सुरू आहे. त्यामुळे भीतीपोटी एसटी बसेसला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. परिणामी महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यास महामंडळाकडे पैसे नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले. अशा परिस्थितीत डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढू लागले आहे. दरवाढीचा फटका महामंडळाला अधिकच बसला आहे. डिझेल भरण्यास पैसे नसल्यामुळे बसेसही उभ्या राहतात. गत काही वर्षांपासून इलेक्ट्रिक बॅटरीवर मोटारसायकल, रिक्षा आणि चारचाकी वाहने धावू लागली आहेत. त्यामुळे महामंडळानेही इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा विचार चालविला आहे.

बाॅक्स

५० बसेस होणार दाखल

राज्य परिवहन महामंडळाकडून इलेक्ट्रिकवर बसेस चालविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्याला ५० बसेस मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक विभाग नियंत्रकांकडून महामंडळाने याबाबत माहिती मागविली आहे. माहिती संकलनाचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बॉक्स

या मार्गावर धावणार बसेस

अमरावती - यवतमाळ, अमरावती - परतवाडा, परतवाडा- अमरावती, दर्यापूर - अमरावती, अमरावती -अकोट, परताडा ते अकोला, वरूड- नागपूर, अमरावती - वर्धा, अमरावती- वरूड, अमरावती चांदूर बाजार आदी मार्गावर या बसेस उपलब्ध धावणार आहेत.

बाॅक्स

खर्चात होणार बचत

विजेवर चालणाऱ्या एसटी बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर खर्चात बचत होणार आहे. अडचणी कमी होतील. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होऊ शकतील. बसच्या चार्चिंगसाठी महत्त्वाच्या ठिकाणी चार्चिंग स्टेशन उभारले जाणार आहेत.

कोट

वरिष्ठ स्तरावरून इलेक्ट्रिक बसेसबाबत विभागाकडून माहिती मागविण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू आहे. ही माहिती संकलित होताच वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केली जाईल.

- श्रीकांत गभणे,

विभाग नियंत्रक

अमरावती

Web Title: 50 ST buses will run on electric in the district