मोर्शी नगराध्यक्षाकरिता ५० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST2019-12-30T06:00:00+5:302019-12-30T06:00:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मोर्शी : नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी रविवारी ५०.२३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शीला रोडे यांच्या आकस्मिक निधनामुळे ...

50 percent voting for Morsi city president | मोर्शी नगराध्यक्षाकरिता ५० टक्के मतदान

मोर्शी नगराध्यक्षाकरिता ५० टक्के मतदान

ठळक मुद्देआज मतमोजणी : वोटर स्लिप न मिळाल्याने नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी रविवारी ५०.२३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शीला रोडे यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी २९ केंद्रांवरून मतदान पार पडले. मात्र, त्या मतदान केंद्रांवर फारसा उत्साह दिसून आला नाही. दरम्यान सोमवारी येथील तहसीलमध्ये सकाळी १० वाजता नऊ टेबलांवर चार फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. भाजप, काँग्रेस, राकाँ व अन्य दोन अशा पाच महिला उमेदवार रिंगणात होत्या.
रविवारी सकाळी ७.३० ते ५.३० दरम्यान एकूण १६,३२३ मतदान झाले. त्यात ९,१२३ पुरुष व ७२०० महिला मतदारांचा समावेश आहे. दरम्यान निवडणूक यंत्रणेद्वारे व्होटर स्लिप वितरित न केल्याने अनेकांचा हिरमोड झाला. शहरातील कुठल्या मतदान केंद्रावर आपले मतदान आहे, ते माहिती न झाल्याने मतदानाची टक्केवारी घसरल्याचे चित्र होते. काही मतदारांना दोन-तीन मतदान केंद्रांवर नाव व मतदानाकरिता फेऱ्या घालाव्या लागल्या. एकाच कुटुंबातील एकाचे मतदान एका केंद्रावर, तर दुसºयाचे नाव दुसºया केंद्रावर असल्याने नाहक त्रास सहन करावा लागला. सकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान ५.२० टक्के, ११.३० पर्यंत १५.०४, दुपारी दीड वाजेपर्यंत २५.६८ टक्के, ३.३० वाजेपर्यंत ३८.१० टक्के व ५.३० पर्यंत एकूण ५०.२३ टक्के मतदान झाले.

Web Title: 50 percent voting for Morsi city president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.