शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

वर्षाकाठी शेतकऱ्यांचे वाचणार ५० कोटी

By admin | Updated: December 21, 2014 22:51 IST

राज्याच्या पणन विभागाने कृषी मालावर मालाच्या विक्री मूल्यावर घेतली जाणारी आडत कपात वसुली बंद करण्याचे आदेश शनिवारी जारी केले. खरेदीदाराकडून शेकडा एक टक्के आडत घेण्याचा

पणन विभागाचा निर्णय : शेतीमालावरील आडत बंद, शेतकऱ्यांकडून स्वागतअमरावती : राज्याच्या पणन विभागाने कृषी मालावर मालाच्या विक्री मूल्यावर घेतली जाणारी आडत कपात वसुली बंद करण्याचे आदेश शनिवारी जारी केले. खरेदीदाराकडून शेकडा एक टक्के आडत घेण्याचा निर्णय राज्याचे पणन संचालकांनी घेतला आहे. सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या विदर्भासाठी हा निर्णय दिलासादायक आहे. शेतमालावर दीड ते अडीच टक्क्यापर्यंत व भाजीपाल्यावर सात टक्यापर्यंत कटणारी आडत थांबल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आडतीसाठी कापण्यात येणारे ५० कोटी रुपये वाचणार आहेत. आडत आकारणी शेतकऱ्यांकरुन करावी की नाही यावरुन राज्यात अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे. याबाबत राज्यशासनाने ठोस भूमिका घेत आडत कपास शेतकऱ्यांच्या पट्टीमधून न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र आडत्या व व्यापाऱ्यामध्ये या निर्णयाप्रती नाराजी आहे.शेती ही पूर्णतह: निसर्गावर अवलंबून आहे. मात्र काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपनामुळे उत्पादन खर्च देखील निघत नाही. उत्पादन खर्चावर आधारित परतावादेखील मिळत नाही व शेतकरी असा एकमेव घाटक आहे की त्यानेच उत्पादित केलेल्या मालाचा भाव त्याला ठरविता येत नाही व या प्रकारात शेतकऱ्यांचे खच्चीकरण होत आहे. त्यातच शेतमाल आडतीवर गेल्यानंतर आडतच्या नावाखाली शेकडा दीड ते अडीच टक्के रकम त्याच्या पट्टीतून कपात होते. जिल्ह्यात अमरावती बाजार समितीसह सर्व तालुका बाजार समिती व उपबाजार आहे. यामध्ये दरवर्षी दीड हजार कोटी पेक्षा जास्त उलाढाल होते. म्हणजे आडतीपोटी किमान ५० कोटी रुपये श्ेतकऱ्यांच्या पट्टीमधून कापले जातात. शिवाय, हमाल, मापारी, वाहतूक खर्च वेगळाच आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे आर्थीक नुकसान होते. अशा परिस्थिीतीत पणन महासंघाचे संचालक सुभाष माने यांनी शनिवार २० डिसेंबरला शासकीय परिपत्रक काढले. त्यात कृषी उत्पन्न बाजार समिती, अनूज्ञाप्ती प्राप्त खासगी बाजार यामध्ये कृषी मालाच्या (भूसार/नाशवंत/बिगरनाशवंत) विक्री मुल्यावर कृषीमाल उत्पादक शेतकरी, कृषक यांच्याकडून आडत कपात/वसुली न करता सर्व प्रकारच्या विक्रीमूल्यावर खरेदी दाराकडून आडत कपात/वसूली करावी, असे आदेश काढले आहे. या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा उपनिबंधकांनी, सहकारी संस्थांनी, कृषी उत्पन्न बाजार समितीनी अनुज्ञप्तीधारक खासगी बाजार यांनी काटेकोरपणे करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)