शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

५० कोटींच्या शेतजमिनीचे ९६० रुपयांत विक्रीचे आदेश; तहसीलदारांकडून अधिकाराचा दुरुपयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 11:06 IST

Amravati : धार्मिक संस्थानची ही शेतजमीन बिल्डर्सच्या घशात ओतण्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : येथील सोमेश्वर धार्मिक संस्थानच्या मौजा पेठ अमरावती येथील ५० कोटी रकमेचे मूल्य असलेल्या शेतजमिनीचे अवघ्या ९६० रुपयात विक्रीचा आदेश अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी २९ सप्टेंबर २०२४ रोजी पारीत केला आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्याकडे तक्रार नोंदविली आहे. तहसीलदार लोखंडे हे धार्मिक संस्थानची ही शेतजमीन बिल्डर्सच्या घशात ओतण्यासाठी कार्यरत असल्याचा आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघाने केला आहे.

श्री सोमेश्वर धार्मिक संस्थानची मौजा-पेठ अमरावती येथे शेत सर्व्हे क्रमांक ९४, क्षेत्रफळ ४ हेक्टर ८५ आर. ही मालकीची जमीन आहे. ही जमीन हडपण्याच्या उद्देशाने सुमन कोठार नामक महिलेने कुळ कायद्याचा आधार घेत ही जमीन खरेदी करण्यासाठी अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांच्याकडे अर्ज सादर केला होता. मात्र, याप्रकरणी तहसीलदार लोखंडे यांनी कुळ कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन करून सोमेश्वर संस्थानचा प्राथमिक आक्षेप अर्ज निकाली न काढता तसेच कोणतेही साक्षी पुरावे न घेता संस्थानच्या मालकीची ५० कोटींचे बाजारमूल्य असलेली ही जमीन ९६० रुपयांत खरेदी करून देण्याचा आदेश पारीत केला. आदेश पारीत केल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २९ सप्टेंबर २०२४ रोजी अपील कालावधीची मुदत संपण्यापूर्वीच खरेदीसुद्धा नोंदवून देण्यात आली आहे. एवढी कार्यतत्परता तहसीलदार लोखंडे यांनी दाखविल्याचा आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोअर कमिटीचे पदाधिकारी अनुप जयस्वाल, निमंत्रक कैलाश पनपालिया यांनी केला. 

मंदिर जमिनींच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाचीमंदिर कोणत्याही स्वरुपाचे असो, त्यांच्या मालकीच्या जमिनींच्या संरक्षणाची जबाबदारी ही शासन अथवा न्यायालयाची आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने ए. ए. गोपालकृष्णन विरुद्ध कोचीन देवस्सम बोर्ड या न्याय निवाड्यात दिले आहे. देवस्थानच्या जमिनींना कूळ कायदा लागू होत नसताना अमरावतीचे तहसीलदार लोखंडे हे पदाचा गैरवापर करून जमिनी हडपणाऱ्या बिल्डर्सच्या बाजूने आदेश पारीत करीत असल्याची तक्रार महाराष्ट्र मंदिर महासंघाने ३ ऑक्टोबर २०१४ रोजी विभागीय आयुक्तांकडे दिली आहे. शेतजमिनीच्या ७/१२ वर सोमेश्वर संस्थानचे नाव आहे.

बिल्डर्स धार्जिणे आदेश पारीत महानगरपालिका हद्दितील शेत जमिन अथवा भूखंडाचे कलम ६० नुसार कुळकायद्यातंर्गत आदेश करता येत नाही. किंबहुना सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे तसे आदेशही आहेत. मात्र तहसीलदार लोखंडे यांनी अर्धन्यायिक अधिकार पदाचा दुरुपयोग करून धार्मिक संस्थानची ही शेतजमीन बिल्डर्स धार्जिणे आदेश पारीत केल्याचा ठपका महाराष्ट्र मंदिर महासंघाने तक्रारीतून ठेवला आहे.

"सोमेश्वर संस्थानच्या मालकीची जमीन ही आतापर्यंत वर्ग १ ठेवली होती. मात्र, आक्षेपानंतर गुरुवार, २८ नोव्हेंबर २०२४ रोजी या जमिनीच्या सातबारावर वर्ग २ असा उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी आता १३ डिसेंबर रोजी सुनावणीची शक्यता आहे. तहसीलदार लोखंडे यांनी कुळ कायदा आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशाला छेद दिला आहे." - अनुप जयस्वाल, राज्य पदाधिकारी, मंदिर महासंघ

टॅग्स :fraudधोकेबाजीAmravatiअमरावतीzpजिल्हा परिषद