चांदूर रेल्वे शहरातील ५ दुकानांना सिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:13 IST2021-04-24T04:13:30+5:302021-04-24T04:13:30+5:30
कोरोना प्रतिबंधासाठी संचारबंदीत निर्बंध अधिक कडक करण्यात आले असून, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ आता सकाळी ७ ते सकाळी ...

चांदूर रेल्वे शहरातील ५ दुकानांना सिल
कोरोना प्रतिबंधासाठी संचारबंदीत निर्बंध अधिक कडक करण्यात आले असून, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ आता सकाळी ७ ते सकाळी ११ अशी करण्यात आली आहे. परंतु, या आदेशाला न जुमानता काही व्यापारी दुकाने उघडून व्यापार करीत आहेत. दररोज दंडात्मक कारवाई सुरू असताना शुक्रवारी नगर परिषदेकडून थेट दुकाने सिल करण्याची मोहीम हाती घेतली. यामध्ये नगर परिषद कॉम्पलेक्समधील अर्जंट मोबाईल रिपेअर सेंटर, एसएस मोबाईल शॉप, चॉईस मेन्स वेअर, श्री गजानन डिजिटल फोटो स्टुडिओ, मेन रोड स्थित राम बूट हाऊस अशा पाच दुकानांना सील लावण्यात आले. या कारवाईमध्ये नगर परिषदेचे कर्मचारी निखिल तट्टे, आशिष कुकडकर, राहुल इमले, विजय रताळे, जितेंद्र कर्से, अनंत वानखडे, गिरीधर चवरे, सुभाष डोंगरे, संजय कर्से, मनीष कनोजे, सागर हटवार, स्वाती गणोरकर, गौरव दरेकर, पोलीस कर्मचारी आदींचा सहभाग होता
पुढील आदेशापर्यंत दुकाने सील राहणार
शुक्रवारी चांदूर रेल्वे शहरात पाच दुकाने सील करण्यात आली. शासनाच्या पुढील आदेशापर्यंत या दुकानांना सील राहणार आहे तसेच पुढेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची दुकाने सील करणे व फौजदारी कारवाई प्रशासनातर्फे करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांनी सांगितले.