पाच लाख क्विंटल तूर बाकी

By Admin | Updated: June 6, 2017 00:10 IST2017-06-06T00:10:52+5:302017-06-06T00:10:52+5:30

तूर खरेदी केंद्रांना शासनाने १० जूनपर्यत मुदतवाढ दिल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच १२ ही केंद्रांवर डीएमओव्दारा तूर खरेदी सुरू करण्यात आली.

5 lakh quintals of tur | पाच लाख क्विंटल तूर बाकी

पाच लाख क्विंटल तूर बाकी

शेडबाहेरील तुरीची खरेदी : २३,३१२ शेतकऱ्यांना टोकन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तूर खरेदी केंद्रांना शासनाने १० जूनपर्यत मुदतवाढ दिल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच १२ ही केंद्रांवर डीएमओव्दारा तूर खरेदी सुरू करण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार सध्या बाजार समितीच्या आवारात परंतु उघड्यावर असलेल्या तुरीची खरेदी व मोजणी सुरू आहे. त्यानंतर टोकन दिलेल्या परंतु शेतकऱ्यांच्या घरी असलेली तूर यार्डात बोलावण्यात येऊन खरेदी करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत २३, ३९४ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आलेले आहे. या शेतकऱ्यांची पाच लाख सात हजार बारा व्किंटल तुरीची खरेदी बाकी आहे.
यापूर्वी सुरू असलेल्या केंद्रांची मुदत ३१ मे रोजी संपल्याने तूर खरेदी बंद होती. मात्र राज्य शासनाचे विनंतीवरून केंद्र शासनाने पुन्हा १० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार शनिवारी जिल्ह्यातील सर्वच १२ ही केंद्रांवरील तूर खरेदी सुरू होती. मात्र रविवारी मोर्शी व अंजनगाव सुर्जी केंद्रात उघड्यावर ठेवण्यात आलेली तूर खरेदी झाल्याने येथील खरेदी बंद होती.
शासनाचे आदेशानुसार बाजार समिती आवारातील तूर खरेदी प्रथम करण्यात येणार आहे.व या खरेदी तुरीची उचल करण्यात येणार आहे. त्यानंतर टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची घरी असलेली तूर खरेदी करण्याचे आदले दिवसी बाजार समितीव्दारा फोन करण्यात येणार आहे. व नंतर ही तूर खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी अशोक देशमुख यांनी दिली.
राज्य शासनाची बाजार हस्तक्षेप योजना सुरू झाल्यापासून म्हणजेच २७ एप्रिल पासून आतापर्यत पाच लाख ७९१ शेतकऱ्यांची १२ हजार ४४३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. तसेच रविवारी ७११ शेतकऱ्यांची ९३ हजार ३० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.
धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीत टिनशेड नसल्यामुळे व सध्या मान्सूनपूर्व पाऊस सुरू असल्याने तूर पावसात ओली होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

खरेदी, मोजणीसाठी शिल्लक तूर
जिल्ह्यात सद्यस्थितीत २३,३९४ शेतकऱ्यांची पाच लाख सात हजार १२ व्किंटल तूर खरेदी बाकी आहे. यामध्ये अचलपूर केंद्रावर २,०६४ शेतकऱ्यांची ४३ हजार ३८५, अमरावती केंद्रावर ४,३८८ केंद्रावर १,२३,३०७, अंजनगाव सुर्जी केंद्रावर २,४४८ शेतकऱ्यांची ४०,८६३, चांदूर बाजार केंद्रावर १,४८३ शेतकऱ्यांची २७,९८६, चांदूर रेल्वे केंद्रावर १,७८५ शेतकऱ्यांची ३४,३०२, दर्यापूर केंद्रावर ३,१५५ शेतकऱ्यांची ८३,००१, धामणगाव केंद्रावर १,४०१ शेतकऱ्यांची २६,२२६,धारणी केंद्रावर १०५ शेतकऱ्यांची १,४०६,मोर्शी केंद्रावर २,१९१ शेतकऱ्यांची ४४,३१८, नांदगाव खंडेश्वर केंद्रावर २,३१७ शेतकऱ्यांची २,३१७ शेतकऱ्यांची ४४,९९६ व वरूड केंद्रावर ८६६ शेतकऱ्यांची १३,५४४ व्किंटल तूर खरेदी अद्याप बाकी आहे.

Web Title: 5 lakh quintals of tur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.