जनसुविधेचे पाच कोटी परत जाणार?
By Admin | Updated: June 8, 2015 00:38 IST2015-06-08T00:38:27+5:302015-06-08T00:38:27+5:30
जिल्हा परिषदेला जनसुविधेसाठी जिल्हा नियोजन समितीने सन २०१३-१४ मध्ये सुमारे ८ कोटी ८२ लाख रूपयांचा ..

जनसुविधेचे पाच कोटी परत जाणार?
दुर्लक्ष : अधिकाऱ्यांची निष्क्रियता कारणीभूत
अमरावती : जिल्हा परिषदेला जनसुविधेसाठी जिल्हा नियोजन समितीने सन २०१३-१४ मध्ये सुमारे ८ कोटी ८२ लाख रूपयांचा निधी मंजूर केला असतानाही मागील दोन वर्षांत हा निधी खर्च झाला नाही.
सदरचा निधी खर्च करण्यासाठी ३१ मार्च अखेरपर्यंत मुदत होती. मात्र त्यानंतरही उपलब्ध निधी असूनही कामे सुरू नसल्याने सुमारे पाच कोटी रूपयाचा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. या सर्व प्रकाराला प्रमुख जबाबदार अधिकारीच कारणीभूत असल्याचा आरोप आ. वीरंद्र जगताप यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेला जनसुविधा योजनेसाठी जिल्हा परिषदेत केलेल्या नियोजनातील मूळ तरतुदीचे २ कोटी ८२ लाख व पुनर्नियोजनासाठी ६ कोटी याप्रमाणे जिल्हा परिषदेला सन २०१३ व २०१४ मध्ये सुमारे ८ कोटी ८२ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
जनसुविधेच्या कामासाठी संबंधित जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत, पंचायत समितीत बसून या कामाचे नियोजन करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद सदस्यांच्या मतदारसंघातील निधी परत जातो याला सदस्यही तेवढेच दोषी आहेत.
- वीरेंद्र जगताप,
आमदार, चांदूररेल्वे.