शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

स्व: जिल्ह्यातील एन्ट्रीसाठी ४८ शिक्षक वेटिंगवरच; १२२ पैकी ७४ शिक्षकांना गैरआदिवासी शाळेत पदस्थापना

By जितेंद्र दखने | Updated: October 4, 2022 18:44 IST

गत दोन वर्ष कोरोनामुळे जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसह जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया रखडली होती.

अमरावती : गत दोन वर्ष कोरोनामुळे जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसह जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया रखडली होती. मात्र आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यातून ४० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानुसार प्रशासनामार्फत या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. मात्र बाहेरील जिल्ह्यातून अमरावती जिल्हा परिषदेत येणाऱ्या १२२ पैकी ७४ शिक्षकांचा अपवाद सोडला तर अजूनही उर्वरित ४८ शिक्षक हजर होण्याच्या वेटिंगवरच आहेत. ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीची प्रक्रिया राबविली. पहिल्या टप्प्यात आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या केल्या. आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या केल्या ४० शिक्षक आंतरजिल्हा बदलीने १६ जिल्ह्यात गेले तर बाहेरील जिल्ह्यातून ७४ शिक्षक अमरावती दाखल झाले. यामध्ये विविध जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश आहे. अद्यापही १२२ पैकी ७४ शिक्षकांचा अपवाद सोडला तर अन्य शिक्षक अजूनही जिल्ह्यात एन्ट्री साठी वेटिंगवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता हे शिक्षक येणार की त्यांना काही दिवस पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार हे पाहण्याजोगे असेल. 

जिल्हा अंतर्गत बदल्या होणार?जिल्हा अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही प्राथमिक शिक्षण विभाग सुरू असून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यांतर्गत बदल्या होण्याची शक्यता आहे ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे जिल्ह्यांतर्गत बदलीबाबतची कारवाई सुरू करण्यात यावी. ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सेवानिवृत्त, निधन किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेली पदे त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर झालेल्या रिक्त जागा तसेच आंतरजिल्हा पद्धतीने रुजू झालेल्या शिक्षकांच्या समायोजन नंतर उर्वरित रिक्त पदे, संभाव्य रिक्त पदे याबाबतचा तपशील ऑनलाइन बदली प्रणालीवर अद्यावत कराव्यात अशा सूचना शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत.

या जिल्ह्यातील शिक्षक येणारअमरावती जिल्हा परिषदेत यवतमाळ, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग , चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, ठाणे आदी जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने १२२ पैकी उर्वरित ४८ शिक्षक येणार आहे. अद्याप या शिक्षकांना तेथील जिल्हा परिषद कार्यमुक्त केले नाही. त्यामुळे हे शिक्षक स्व: जिल्ह्यात येण्यासाठी वेटिंगवरच आहेत.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीSchoolशाळाTeacherशिक्षक