४५६ नागरिकांची नेत्र तपासणी
By Admin | Updated: July 25, 2016 00:24 IST2016-07-25T00:24:10+5:302016-07-25T00:24:10+5:30
भारतीय जनता पक्ष, डॉ. महात्मे आय हॉस्पिटल व जिल्हा अंधत्व निवारण समितीच्या संयुक्त विद्यमाने २२ जुलै रोजी ...

४५६ नागरिकांची नेत्र तपासणी
प्रणय कुळकर्णी यांचा उपक्रम : अमृता फडणविसांची उपस्थिती
अमरावती : भारतीय जनता पक्ष, डॉ. महात्मे आय हॉस्पिटल व जिल्हा अंधत्व निवारण समितीच्या संयुक्त विद्यमाने २२ जुलै रोजी आदिवासी नगरातील गुरूदेव समाज मंदिरात आयोजित शिबिरात ४५६ नागरिकांचे नेत्र तपासणी करण्यात आली. शिबिराला अमृता देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.
शहर भाजपाचे उपाध्यक्ष प्रणय कुळकर्णी यांनी हे शिबिर आयोजित केले होते. रुग्ण तपासणी झालेल्यांपैकी ३४ नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या नागरिकांचा तीन दिवसांचा खर्च आयोजक करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन होते. यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष जयंत डेहणकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, अनिल आसलकर, चेतन गावंडे, सतीश करेशिया, सुरेखा लुंगारे, सुधा तिवारी, रिता मोखलकर, विवेक कलोती, कौशिक अग्रवाल, ललित समदूरकर, सचिन रासने, राजू कुरील, लता देशमुख, शिल्पा पाचघरे, अलका सप्रे, अजय सारस्कर, राजू आसेगावकर व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)