स्वतंत्र विदर्भासाठी ४,५०० ग्रापंचा पुढाकार

By Admin | Updated: December 10, 2015 00:17 IST2015-12-10T00:17:20+5:302015-12-10T00:17:20+5:30

विदर्भाला वेगळा इतिहास आहे. त्यामुळेच केंद्र शासनाने स्वतंत्र विदर्भासाठी पुढाकार घ्यावा, याकरिता विदर्भातील साडेचार हजार ग्रामपंचायतींनी वेगळ्या विदर्भाचा ठराव पारित करणे सुरु केले आहे़....

4,500 initiatives for independent Vidarbha | स्वतंत्र विदर्भासाठी ४,५०० ग्रापंचा पुढाकार

स्वतंत्र विदर्भासाठी ४,५०० ग्रापंचा पुढाकार

सरपंच संघटनेचा पुढाकार : प्रजासत्ताकदिनी मुख्यमंत्र्यांना देणार ठराव
मोहन राऊत अमरावती
विदर्भाला वेगळा इतिहास आहे. त्यामुळेच केंद्र शासनाने स्वतंत्र विदर्भासाठी पुढाकार घ्यावा, याकरिता विदर्भातील साडेचार हजार ग्रामपंचायतींनी वेगळ्या विदर्भाचा ठराव पारित करणे सुरु केले आहे़ प्रजासत्ताकदिनी राज्याला व केंद्राला या ठरावाची प्रत देण्यात येणार आहे़
स्वतंत्र विदर्भासाठी जनमताचा कौल घेण्याची मागणी राज्याचे महाअभियोक्ता श्रीहरी अणे यांनी केल्यानंतर विदर्भात लोकचळवळ उभारण्यास सुरूवात झाली आहे़ विदर्भाच्या ग्रामीण भागात जनजागृतीचे काम सुरु आहे़ स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते, बेरोजगारीचे प्रमाण देखील कमी होऊ शकते, अशा विविध मुद्यांच्या आधारे विदर्भातील ग्रामपंचायतींमध्ये ठराव घेण्याचे काम सुरू आहे़ मागिल तीन दिवसात्ां विदर्भातील जवळपास ३२१ ग्रामपंचायतींमध्ये स्वतंत्र विदर्भाचा ठराव घेतल्याची माहिती आहे़
संयुक्त महाराष्ट्रापूर्वी विदर्भ मध्यप्रदेशात होता़ येथील भाषाही हिंदी होती़ महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मराठी भाषेचा प्रदेश म्हणून हा भाग ओळखला जातो. विदर्भातील सर्वाधिक महसूल पश्चिम महाराष्ट्राला मिळतो. एकीकडे पश्चिम महाराष्ट्राचा विकास झपाट्याने झाला तर दुसरीकडे विदर्भाचा अनुशेष कोट्यवधी रूपयांनी वाढला आहे़ येथे शिक्षणाचे प्रमाण सर्वाधिक असताना बेरोजगारांची संख्याही लाखाच्या घरात आहे़ राज्य तथा केंद्र शासन दरवर्षी विशेष पॅकेज जाहीर करते. पण, या पॅकेजचा लाभ पश्चिम महाराष्ट्राला मिळतो, असे सरपंच, उपसरपंच, ग्रा़पं़ सदस्य ग्रामस्थांना पटवून देत आहेत.

स्वतंत्र विदर्भासाठी जनमताचा कौल घेणे गैर नाही. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, नागपूर येथील ग्रापंच्या ग्रामसभेत स्वतंत्र विदर्भाचा ठराव घेण्याच्या प्रक्रियेला सरपंच संघटनेकडून वेग आला आहे़ साडेचार हजार ग्रापंचे ठराव मुख्यमंत्री फडवणीस यांना प्रजासत्ताकदिनी दिले जातील.
- गजानन बोंडे
संस्थापक अध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना

Web Title: 4,500 initiatives for independent Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.