शहानूरच्या ‘फिल्टर प्लान्ट’करिता ४५ कोटी

By Admin | Updated: July 29, 2016 00:25 IST2016-07-29T00:25:37+5:302016-07-29T00:25:37+5:30

१५६ गावे व २ शहरांना जोडणारी शहानूर पाणीपुरवठा योजनेत नव्याने ९० गावे समाविष्ट झाली आहेत.

45 crores for 'Shihanoor' filter plant | शहानूरच्या ‘फिल्टर प्लान्ट’करिता ४५ कोटी

शहानूरच्या ‘फिल्टर प्लान्ट’करिता ४५ कोटी

प्रकाश भारसाकळे : दर्यापुरात भाजपाचा मेळावा
दर्यापूर : १५६ गावे व २ शहरांना जोडणारी शहानूर पाणीपुरवठा योजनेत नव्याने ९० गावे समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे नवीन पाणी शुद्धीकरण प्रकल्पाकरिता ४५ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केला आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सदर प्रकल्प झाल्यानंतर दर्यापूर मतदारसंघातील नागरिकांना पाणी कमी पडणार नाही, असे प्रतिपादन अकोटचे आ.प्रकाश भारसाकळे यांनी केले. गुरुवारी माहेश्वरी भवन येथे आयोजित भाजपा तालुका व शहर कार्यकर्ता मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना केले.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज रहा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती तथा काँग्रेसचे नेते बाळासाहेब वानखडे यांच्यासमवेत शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. व्यासपीठावर आ. रमेश बुंदिले, भाजपाचे तालुकाध्यक्ष विजय मेंढे, शहराध्यक्ष अनिल कुंडलवाल, दादासाहेब गणोरकर, वासुदेव जवंजाळ, भैयासाहेब देवके, बाजार समिती उपसभापती नरेंद्र ब्राम्हणकर, संचालक कपिल देवके, नगरसेवक नाना माहुरे, नलिनी भारसाकळे, शंकर भदे, अनिल बोंडे, बाळासाहेब राऊत, रामेश्वर कावरे, डॉ. रवींद्र साबळे, सुभाष हरणे, श्रीकृष्ण बुंदिले, युवा मोर्चाचे संदीप गुडधे, रवींद्र साबळे, विजय भारसाकळे, सुरेश कानुगो, भरत शुक्ला, अर्चना मुळे, शुभांगी घाटे, भास्कर हिवराळे, दामोदर होले, गोवर्धन गावंडे, पांडुरंग हुरबडे, भरत राणे, गणेश देशमुख, रमेश होले, अतुल गोळे, हबीब ठेकेदार उपस्थित होते.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब वानखडे, मदन बायस्कार, मनीष कोरपे, संजय मावळे, विनोद पवार, अरविंद पावडे, किरण देशमुख, किशोर देशमुख, रामेश्वर चव्हाण, संजय होले, तुषार बायस्कार, विनय गावंडे आदी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक गोपाल चंदन, माजी नगराध्यक्ष विजय विल्हेकर यांनीही भाजपात प्रवेश घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: 45 crores for 'Shihanoor' filter plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.