शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

443 कोटींचा आराखडा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 05:01 IST

बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेत सन  २०२२-२३ या वर्षात सर्वसाधारण योजनेत २६० कोटी ५६ लाख नियतव्यय, अनुसूचित जाती उपयोजनेत १०१ कोटी २० लाख व आदिवासी उपयोजनेत ८१ कोटी ५५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. मेळघाटसह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विकासकामांचा समावेश नियोजनात करण्यात आला आहे.  त्याचप्रमाणे, सर्व लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांची मागणी लक्षात घेऊन आवश्यक तरतुदी करण्यात येतील.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा वार्षिक योजनेत सन २०२२-२३ या वर्षात विविध विकासकामांसाठी ४४३ कोटी ३१ लाख रुपयांचे निधीच्या आराखड्याला १२ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ चा आराखडा व चालू वर्षातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री यशोमती ठाकूर अध्यक्षतेखाली  पार पडली. या बैठकीला कोविड प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने पालकमंत्री व इतर अनेक लाेकप्रतिनिधी बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले होते. जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, खा. रामदास तडस, आमदार सुलभा खोडके, बळवंत वानखडे, राजकुमार पटेल, देवेंद्र भुयार, प्रताप अडसड,  किरण सरनाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, महापौर चेतन गावंडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेत सन  २०२२-२३ या वर्षात सर्वसाधारण योजनेत २६० कोटी ५६ लाख नियतव्यय, अनुसूचित जाती उपयोजनेत १०१ कोटी २० लाख व आदिवासी उपयोजनेत ८१ कोटी ५५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. मेळघाटसह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विकासकामांचा समावेश नियोजनात करण्यात आला आहे.  त्याचप्रमाणे, सर्व लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांची मागणी लक्षात घेऊन आवश्यक तरतुदी करण्यात येतील. विकासकामांना निधीची उणीव भासू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.महिला व बालकांच्या सशक्तीकरणासाठी विविध योजना, उपक्रम, महिला व बालविकास भवन, महिला बचत गटांचे जाळे, आरोग्य सेवेचे बळकटीकरण, जिल्हा व ग्रामीण रस्त्यांचा विकास व बळकटीकरण, पर्यटनासाठी पायाभूत सुविधा, कृषी संलग्न सेवा आदी बाबींचा नियोजनात समावेश आहे.

दोन खासदार, तीन आमदारांचा ‘त्या’ दोन विषयांना विरोधजिल्हा परिषदेसाठी मंजूर करण्यात येणाऱ्या निधीचे व्यवस्थितपणे वितरण होत नसल्याचा आरोप जिल्हा नियोजन समिती सदस्यांनी केला आहे. यासंदर्भात खासदार रामदास तडस, नवनीत राणा, आमदार प्रताप अडसड, रवि राणा आणि राजकुमार पटेल, महापौर चेतन गावंडे तसेच जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे आदी सदस्यांनी सदर प्रारूप आराखड्यास आमची मान्यता नसल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे  समिती अंतर्गत सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या विषय सूचिवरील विषय क्रमांक २ मध्ये सन २०२१-२२  माहे डिसेंबर अखेरपर्यंत खर्चाचा आढावा, खर्चास मान्यता हा विषय तसेच विषय क्रमांक ३ जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ आराखड्यास मान्यता देणे हा विषय ठेवण्यात आला होता. 

मिशन मोडवर पूर्ण करा विकासाची कामेयापूर्वीच्या नियोजनानुसार ३०० कोटी रूपये निधीतून जिल्ह्यात अनेक महत्त्वपूर्ण कामांना चालना देण्यात आली. कोविडकाळात आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा व ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यात आले. नियोजनातील अनेक कामे अद्यापही प्रगतीपथावर आहेत. विहित मुदतीत ती कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. कुठलेही काम प्रलंबित व निधी अखर्चित राहता कामा नये. प्रशासनाने ‘मिशन मोड’वर प्रत्येक काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले. 

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर