अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या ४,४०७ जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:12 IST2021-03-20T04:12:58+5:302021-03-20T04:12:58+5:30

अमरावती : इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण ४,४०७ जागा रिक्त आहेत. मात्र, अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा १९ ...

4,407 vacancies for 11th online admission | अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या ४,४०७ जागा रिक्त

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या ४,४०७ जागा रिक्त

अमरावती : इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण ४,४०७ जागा रिक्त आहेत. मात्र, अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा १९ ते २६ मार्च दरम्यान ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. यानंतर अकरावी प्रवेशासाठी संधी मिळणार नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केेले आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२०-२०२१ मध्ये एफसीएफएस नवीन प्रवेश फेरी १९ मार्चपासून सुरू होत आहे. याबाबतचे वेळापत्रक शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अकरावी प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना यात संधी देण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे यांनी पत्राद्वारे कळविले आहे. अकरावी प्रवेशाच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी अभ्यासक्रमासाठी प्रवेशक्षमता १५ हजार ३६० आहे. त्यापैकी १० हजार ९३५ जागांवर प्रवेश झाला असून, आतापर्यंत ४४०७ जागा रिक्त असल्याची माहिती केंद्रीय प्रवेश समितीचे सदस्य अरविंद मंगळे यांनी ‘लोकमत’ला दिली.

------------------

अशी आहे अकरावी प्रवेशाची सद्यस्थिती

शाखा क्षमता प्रवेश रिक्त जागा

कला ३३७५ २२५४ १०८४

वाणिज्य २४२५ १९३० ४९५

विज्ञान ६४५० ५५४१ ९९९

एमसीव्हीसी ३०२० ११७३ १८२९

Web Title: 4,407 vacancies for 11th online admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.