३६२ गावांतील पाणीटंचाईसाठी ४ कोटी
By Admin | Updated: May 10, 2014 23:55 IST2014-05-10T23:55:57+5:302014-05-10T23:55:57+5:30
जिल्ह्यामधील पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखड्यामधील एप्रिल ते जून २०१४ मध्ये पाणी टंचाईची तीव्रता अधिक आहे.

३६२ गावांतील पाणीटंचाईसाठी ४ कोटी
अमरावती : जिल्ह्यामधील पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखड्यामधील एप्रिल ते जून २०१४ मध्ये पाणी टंचाईची तीव्रता अधिक आहे. या तिसर्या टप्प्यात जिल्ह्यामधील २३१ गावांमधील पाणी टंचाईची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान १८१ गावे या आराखड्यात आहे. जानेवारी ते जून २०१४ दरम्यान पाणी टंचाई निवारणार्थ ४ कोटी ४ लक्ष २९ हजारांचा निधी शासनाने उपलब्ध केला आहे. पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात आॅक्टोबर २०१३ ते जून २०१४ दरम्यान ३६२ गावांमध्ये पाणी समस्या उद्भवू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारा अनेक कामे प्रस्तावित केली आहे. यामध्ये ३८८ नळ योजनांची दुरूस्ती, १३४३ हातपंप, १९४ विजपंप, १४५९ सार्वजनिक व १६१८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यासाठी ५८ लाख २५ हजार निधी खर्च करण्यात येत आहे. नळ योजनांच्या विशेष दुरूस्ती ७३ कामे प्रस्तावित आहेत. यासाठी १ कोटी ५५ लाख ५० हजार रूपये मंजूर आहे. १३ तात्पुरत्या पूरक नळयोजना करण्यात येत आहे यासाठी ३९ लाखांचा निधी मंजूर आहे. २१७ नवीन विंधन विहीर तयार करण्यात येत आहे. यासाठी १ कोटी ३६ लाख २० हजार रूपये निधीची आवश्यकता आहे. पाणी टंचाईसाठी जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारा ४ कोटी ४ लाख २९ हजारांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.