४४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक

By Admin | Updated: May 6, 2015 00:15 IST2015-05-06T00:15:55+5:302015-05-06T00:15:55+5:30

तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणुक कार्यक्रम ठरविण्यात आला आहे.

44 Gram Panchayats election to Sarpanch | ४४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक

४४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक

नांदगाव तालुका : २१ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच होणार
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणुक कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. त्यापैकी २१ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदी महिलांची वर्णी लागणार आहे.
तालुक्यात ४४ ग्रामपंचायतमध्ये ११८ वॉर्डासाठी ३६९ सदस्य निवडून आले. जामगाव येथे सर्वसाधारण जागेसाठी ८ मे रोजी सरपंचाची निवड होणार आहे. पहूर येथे अनुसूचित जाती (महिला जागेसाठी) ८ मे रोजी सरपंचपदाची निवड होत आहे. ढवळसरी येथे अनुसूचित जाती (महिला) सरपंचपदाची ९ मे रोजी निवडणूक होत आहे. अडगाव बु. येथे सर्वसाधारण जागेसाठी ९ मे रोजी सरपंचाची निवड, टाकळी बु. येथे सर्वसाधारण (महिला) सरपंचपदासाठी ९ मे रोजी निवडणूक होत आहे.
पापळ व पिंप्री निपाणी ग्रामपंचायतमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्ग पदासाठी, म्हसला येथे ना. मा. प्र. महिला सरपंचपदासाठी, एरंडगाव ग्रामपंचायतमध्ये सर्वसाधारण पदासाठी सरपंच निवड, लोणी ग्रामपंचायतमध्ये सर्वसाधारण सरपंच पदासाठी निवड, लोणी ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जाती (महिला) सरपंच पदासाठी, दहिगाव ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जाती सरपंचपदासाठी, वाटपूर येथे सर्वसाधारण पदासाठी, सिद्धनाथपूर येथे ना. मा. प्र. (महिला) सरपंच पद, हिवरा बु. येथे सर्वसाधारणसाठी , धानोरा फशी अनुसूचित जाती, शिवणी रसुलापूर सर्वसाधारण पदासाठी व येणस येथे सर्वसाधारण, वेणी गणेशपूर सर्वसाधारण (महिला) व पिंपळगाव निपाणी ग्रा. पं. मध्ये ना. मा. प्र. महिला सरपंच पदासाठी ९ मे रोजी निवडणूक होत आहे.
१० मे रोजी दाभा (ना.मा.प्र.), जनुना (सर्वसाधारण) महिला, वाढोणा रामनाथ अनुसूचित जाती, सातरगाव अनुसूचित जाती, धानोरा (गुरव) सर्वसाधारण (महिला), नांदसावंगी सर्वसाधारण महिला, सुलतानपूर अनुसूचित जाती जमाती (महिला), धानोरा शिक्रा ना. मा. प्र., मोखड ग्रा. पं. ना. मा. प्र., मंगरुळ चवाळा ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जमाती (महिला), सालोड ग्रा. पं. मध्ये सर्वसाधारण (महिला) सरपंचपदासाठी १० मे रोजी निवडणूक होत आहे.
१२ मे रोजी जावरा, पिंप्री गावंडा, कोठोडा, सार्सी, शेलू (नटवा), बेलोरा, कणी (मिर्झापूर) या ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. तर, १६ मे रोजी शिवरा, खंडाळा खुर्द आणि १७ मे रोजी खानापूर ग्रा. पं. च्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

महिलांमध्ये उत्साह
तालुक्याच्या राजकारणात ग्रामपंचायतचे अधिक महत्त्व असते. यंदा नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ४४ पैकी २१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी महिला विराजमान होणार असल्याने सत्ताप्राप्तीसाठी इच्छुक युवकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. अनेक ठिकाणी महिला आरक्षण असल्याने फजिती झाली आहे. सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडीकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

Web Title: 44 Gram Panchayats election to Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.