४३ आपद्ग्रस्तांना महसूलची सानुग्रह मदत
By Admin | Updated: August 2, 2016 00:17 IST2016-08-02T00:17:55+5:302016-08-02T00:17:55+5:30
हैदरपुरा येथील अंबानाल्याच्या काठावर असलेल्या ९५ घरांना अतिवृष्टिने नुकसान झाले होते.

४३ आपद्ग्रस्तांना महसूलची सानुग्रह मदत
अमरावती : हैदरपुरा येथील अंबानाल्याच्या काठावर असलेल्या ९५ घरांना अतिवृष्टिने नुकसान झाले होते. सर्वेक्षणाअंती ४३ आपद्ग्रस्त पात्र कुटुंबियांना महसूल विभागाच्यावतीने सानुग्रह मदत करण्यात आली. आ. सुनील देशमुख यांच्या हस्ते आपद्ग्रस्त कुंटुंबियांना धनादेश देण्यात आले.
२६ जुलैच्या अतिवृष्टिने हैदरपुरा येथील अंबानाल्याच्या काठावर असलेल्या ९५ घरांमध्ये पाणी शिरुन नुकसान झाले होते. यात जीवनावश्यक साहित्य, भांडी-कुंडी, अन्न धान्य आदींचे नुकसान झाले होेते. यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार महसूल विभागाने ४३ कुटुंबियांना १ लाख ६४ हजार रुपये सानुग्रह रक्कम वाटप केली. यावेळी नगरसेवक अब्दूल रफिक, नगरसेवक हमीद शद्दा, शंकरराव हिंगासपुरे, तहसीलदार सुरेश बगळे, नायब तहसीलदार मेश्राम, मांजरे, मंडळ अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)