४३ शासकीय सेवा 'आॅनलाईन'

By Admin | Updated: May 27, 2016 00:35 IST2016-05-27T00:35:00+5:302016-05-27T00:35:00+5:30

शासनाने सेवा हमी कायदा लागू केल्यामुळे नागरिकांना विविध सेवा उपलब्ध केली जात आहे.

43 Government service 'online' | ४३ शासकीय सेवा 'आॅनलाईन'

४३ शासकीय सेवा 'आॅनलाईन'

नागरिकांना सुविधा : सेवा हमी कायदा लागू
अमरावती : शासनाने सेवा हमी कायदा लागू केल्यामुळे नागरिकांना विविध सेवा उपलब्ध केली जात आहे. यामध्ये ४३ शासकीय सेवा आॅनलाईन करण्यात आल्याने नागरिकांची पायपीट थांबणार आहे. तसेच विविध प्रमाणपत्रे आॅनलाईन मिळणार आहे.
राज्यात 'राइट टू सर्व्हिस अ‍ॅक्ट' अर्थात सेवा हमी कायदा लागू झाल्याने नागरिकांना जन्मदाखला, लग्नाचा दाखला, लायसन्ससारखे ४३ सरकरी सेवा मिळण्यासाठी आता कार्यालयाचे दरवाजे झिजविण्याची गरज राहिली नाही.
यासर्व सेवा नागरिकांना आता क्लिकवर मिळणार आहे. यासाठी सरकारी वेब साईटवर संबंधित महसूल विभाग, मुंद्राकण नोंदणी विभाग, ग्रामविकास व पंचायत राज्य विभाग, कामगार विभाग, जलसंपदा विभाग, शासन मुद्रन लेखनसाम्रगी विभाग आदि विभागांच्या सेवाचा यामध्ये समावेश आहे. येत्या मार्च २०१७ पर्यत या सेवांचा आकडा १३५पर्यत पोहोचणार आहे.
यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंडाची तरतूद राज्य सरकारने केली आहे. निर्धारित वेळेत सेवा मिळाली नाही, तर जबाबदार अधिकाऱ्यांना ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद या कायद्यात आहे. वय राष्ट्रीयत्व, अधिवाय प्रमाणपत्र, मिळकतीचे प्रमाणपत्र, तात्पुरते रहिवासी प्रमाणपत्रे, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, पतदाखला, सांस्कृतिक कार्यक्रम, परवाना, प्रमाणित नकल मिळविण्याबाबत अर्ज, अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचा दाखला, सर्वसाधारण प्रमाणपत्र, दुर्गम भागात राहत असल्याचे प्रमाणपत्र, जन्म नोंद दाखला, मृत्यू नोंद दाखला, कंत्राटी कामगार अनूज्ञप्ती नूतनीकरण, नोकरी उत्सूक उमेदवारांची नोंदणी, सेवा निय९ाजनाची नोंदणी, शोध उपलब्ध करणे, मुल्यांकन अहवाल देणे, दस्त नोंदणी ई-पेमेंट, पध्दतीने भरलेल्या नोंदणी फी चा परतावा आदी सेवांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 43 Government service 'online'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.