जिल्ह्यातील ९० सिंचन प्रकल्पात ४१.३७ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST2021-07-19T04:10:13+5:302021-07-19T04:10:13+5:30

अमरावती : गत दोन ते तीन दिवस जिल्ह्यात पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे उकाडा वाढला होता. रविवारी पुन्हा पावसाने ...

41.37% water storage in 90 irrigation projects in the district | जिल्ह्यातील ९० सिंचन प्रकल्पात ४१.३७ टक्के पाणीसाठा

जिल्ह्यातील ९० सिंचन प्रकल्पात ४१.३७ टक्के पाणीसाठा

अमरावती : गत दोन ते तीन दिवस जिल्ह्यात पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे उकाडा वाढला होता. रविवारी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, अद्याप सिंचन प्रकल्पांत पाहिजे तेवढा पाणीसाठा झालेला नाही. जिल्ह्यातील ९० सिंचन प्रकल्पात सरासरी ४१.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

यामध्ये पाच मध्यम प्रकल्पात ३८.९३ टक्के पाणीसाठा आहे. ८४ लघु प्रकल्पात ३२.७५ टक्के पाणीसाठा आहे, तर अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात १८ जुलै रोजीच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार ४५.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पामध्ये शहानूर प्रकल्पात सरासरी ३९.५३ टक्के पाणीसाठा आहे, तर चंद्रभागा ४९.४८ टक्के, पूर्णा प्रकल्पात सर्वाधिक ५७.११ टक्के पाणीसाठा असून दोन गेट तीन सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे. त्यातून ३.९६ घनमीटर प्रतिसेंकद पाण्याचा विसर्ग होत आहे. सपन प्रकल्पात ५५.३१ टक्के, पंढरी प्रकल्पात ८.१० टक्के पाणीसाठा आहे. यंदा परतीच्या पावसात धरणे शंभर टक्के भरतील, असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व जलतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या प्रकल्पांची स्थिती पाहता पिण्याच्या पाण्याची समस्या मिटल आहे. सिंचनासाठी पाणी देण्यातसाठी प्रकल्पांत अपेक्षीत पाणीसाठा साचणे महत्त्वाचे आहे.

Web Title: 41.37% water storage in 90 irrigation projects in the district