जिल्ह्यात दहावीच्या ४०,६६३ विद्यार्थ्यांची ढकलगाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST2021-04-22T04:13:32+5:302021-04-22T04:13:32+5:30
अमरावती : काेविड १९ ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ...

जिल्ह्यात दहावीच्या ४०,६६३ विद्यार्थ्यांची ढकलगाडी
अमरावती : काेविड १९ ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात दहावीचे ४०,६६३ विद्यार्थी थेट पुढील वर्गात प्रवेश घेणार आहे. शिक्षण मंडळामार्फत अंतर्गत मूल्यमापनाद्धारे उत्तीर्ण करण्यात येणार आहे.
केंद्रीय व आंतरराष्ट्रीय मंडळांनी दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे गुणांच्या समाणिकरणासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे हुशार विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पण, ‘ढ’ विद्यार्थ्यांनी ही नामी संधी ठरली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कसे करायचे याबाबत लवकरच गाईडलाईन जारी करण्यात येणार आहे. मात्र, परीक्षेच्या तयारीसाठी रात्रंदिवस ६ ते ८ तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.
--------------------
कोट
यंदा दहावीची परीक्षा होणार असल्याने मुलीने बरीच तयारी केली होती. ऑनलाईन शिक्षणाव्यतिरिक्त खासगी शिकवणीतून अभ्यासाची तयारी पूर्ण झाली. आता परीक्षाच रद्द केल्याने वर्षभर अभ्यासासाठी घेतलेले श्रम वाया गेले.
- राजकन्या मराठे, पालक.
---------------
कोट
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. लॉकडाऊनच्या काळात ऑफलाईन परीक्षा होणार असल्याने मुलाने अभ्यासासाठी बऱ्यापैकी तयारी केली. प्रश्नसंच सोडवून बघितले. मात्र, ही सर्व मेहनत पाण्यात गेली. परीक्षा न घेता उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळेल.
राजेश सपकाळे, पालक.