जयसिंग सोसायटीतून ४० हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:12 IST2021-04-04T04:12:45+5:302021-04-04T04:12:45+5:30
जयसिंग सोसायटीचे सचिव गजानन बोडखे यांच्या फिर्यादीवरून महेश प्रभाकर गौड (रा. पथ्रोट) याच्यावर संशयित आरोपी म्हणून चोरीचा गुन्हा दाखल ...

जयसिंग सोसायटीतून ४० हजार लंपास
जयसिंग सोसायटीचे सचिव गजानन बोडखे यांच्या फिर्यादीवरून महेश प्रभाकर गौड (रा. पथ्रोट) याच्यावर संशयित आरोपी म्हणून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ मार्च रोजी संस्थेचे सचिव गजानन बोडखे यांनी बाजूच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत ४० हजार रुपयांची रक्कम जमा करण्याकरिता पाठविली होती. परंतु, त्या रकमेमध्ये खराब नोटा असल्याचे कारण देऊन बँकेने ते सर्व पैसे त्यांना परत केले होते. बँकेतून परत आलेली रक्कम सचिवांच्या टेबलवर ठेवली असता, तेथून अचानक लंपास झाली होती. याबाबत सचिवांनी संचालक मंडळाच्या निर्दशनास आणून देऊन संचालक मंडळाने संशयित व्यक्तीबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले होते. परंतु, त्या संशयित व्यक्तीने लंपास झालेल्या रकमेपैकी २० हजार रुपये जमा न केल्याने सचिव बोडखे यांनी पथ्रोट पोलीस ठाण्यात नोंदविली.
--------------------------