पाण्यात ४० टक्के रासायनिक प्रदूषण
By Admin | Updated: December 30, 2014 23:25 IST2014-12-30T23:25:25+5:302014-12-30T23:25:25+5:30
जिल्ह्याभरातील पाणी स्त्रोत नमुन्यांच्या तपासणीत नायट्रेटची अधिक मात्रा आढळून आल्याने ४० टक्के पाणी रासायनिकदृष्ट्या दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तुरळक प्रमाणात फ्लोराईड,

पाण्यात ४० टक्के रासायनिक प्रदूषण
वैभव बाबरेकर - अमरावती
जिल्ह्याभरातील पाणी स्त्रोत नमुन्यांच्या तपासणीत नायट्रेटची अधिक मात्रा आढळून आल्याने ४० टक्के पाणी रासायनिकदृष्ट्या दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तुरळक प्रमाणात फ्लोराईड, क्लोराईड, हार्डनेस, अल्कलिनिटी व टरबिरीटीसुद्धा असल्याने जिल्ह्यावासीयांच्या आरोग्यास धोका होण्याची दाट शक्यता आहे.
पाणी हे जीवनाचे अमूल्य घटक असून पाणी अशुध्दतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यात हजारो पाणी स्त्रोतातून सुमारे ३० लाख नागरिक पाणीपुरवठा होतो. मात्र, हे पाणी शुध्द असेल याची हमी देता येणार नाही. पाणी शुद्धतेसाठी केंद्र व राज्य सरकारची यंत्रणा कार्यरत आहे. त्यासाठी शासनाकडून पाणी तपासणी प्रयोगशाळा जिल्ह्यात सुरु करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी निसर्गात होणाऱ्या बदलात पाणी स्त्रोतांची काय स्थिती आहे त्याकरिता शासनाकडून जिल्ह्यातील पाच ठिकाणी उपविभागीय प्रयोगशाळा सुरु आहेत.
ग्रामीण भागात नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, मोर्शी, धारणी व अचलपूर येथे उपविभागीय प्रयोगशाळेत अनुजीव व रासायन तपासणी करण्यात येते. अमरावती शहरातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत जून २०१३ ते एप्रिल २०१४ पर्यंत ५ हजार ४६ पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये ३ हजार ७७३ नमुने दूषित आढळून आले आहे. हे प्रमाण ७४ टक्के आहे. या वर्षात २२०० पाणी नमुने तपासणीचे उद्दिष्टे प्रयोगशाळेला आहे.