घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ४० कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 22:51 IST2018-11-24T22:51:10+5:302018-11-24T22:51:37+5:30
घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तीन ठिकाणी प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी ४०.७० कोटींचा डीपीआर मंजूर करण्यात आल्याची माहिती संजय निपाणे यांनी महापालिकेच्या आमसभेदरम्यान दिली.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ४० कोटी मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तीन ठिकाणी प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी ४०.७० कोटींचा डीपीआर मंजूर करण्यात आल्याची माहिती संजय निपाणे यांनी महापालिकेच्या आमसभेदरम्यान दिली.
महापालिकेची १५ नोव्हेंबरला यासंदर्भात बैठक झाली होती. महापौर संजय नरवणे यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत चर्चा केली होती. या प्रकल्प अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे १ सप्टेंबरला तांत्रिक मंजुरात देण्यात आली आहे. शासननियुक्त उच्चस्तरीय समितीने बायोमायनिंग कंपोस्ट वगळता उर्वरित अहवालास ४ सप्ष्टेंबरला मंजुरात दिली आहे. यामध्ये शहरातील प्रक्रिया न करता साठविलेल्या घनकचऱ्यावर बायोमायनिंग या शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यास मान्यता दिली आहे.
सुकळी कंपोस्ट डेपो २०० एमटीपी, अकोली बायपास १०० व कोंडेश्वर येथे ५० एमटीपी क्षमतेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित होतील. या अंतर्गत कचºयावर प्रक्रिया करणे. दैनंदिन घनकचºयावर प्रक्रिया करणे, खतनिर्मिती, बायोगॅस प्लॉट कार्यान्वित करणे, एम.आर.एफ व एस.एल.एफ तयार करणे आदींचा या प्रकल्पात समावेश राहणार आहे. २० नोव्हेंबरला झालेल्या महापालिकेच्या आमसभेत आयुक्त संजय निपाणे यांनी प्रकल्प मंजूर झाल्याची माहिती दिली.