अवैध चराई करताना ४० गुरे पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:17 IST2017-12-17T23:16:34+5:302017-12-17T23:17:15+5:30
राखीव जंगलक्षेत्रात अवैध चराई करताना ४० गुरे पकडून रविवारी जनावरांच्या मालकावर कारवाई करण्यात आली.

अवैध चराई करताना ४० गुरे पकडली
आॅनलाईन लोकमत
पोहरा (बंदी) : राखीव जंगलक्षेत्रात अवैध चराई करताना ४० गुरे पकडून रविवारी जनावरांच्या मालकावर कारवाई करण्यात आली. चांदूर रेल्वे व सावंगा परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी भुरा मीर (२४, चिरोडी) याला अटक केली.
अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मीणा हे चांदूर रेल्वे, पोहरा येथे जंगल संरक्षणाच्या अनुषंगाने गेले असता चिरोडी वनखंड क्रमांक २२२ मध्ये २४ काठेवाडी गुरे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी डीएफओ मीणा यांच्यासोबत वनसंरक्षक अशोक कविटकर हेदेखील होते. यावेळी मीणा यांनी ही गुरे स्वत: पकडून वनकर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिलेत. पुढे सावंगा जंगल क्षेत्रात ते फिरस्तीवर असताना गवत रमना या वनखंड क्रमांक ३०९ मध्ये अवैध चराई करताना १६ गुरे दिसून आले. अवैध चराई करतानाचे गुरे पकडून ते संबंधित वनकर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी दोन वनगुन्हे जारी करण्यात आले आहे. डीएफओ मीणा यांनी अवैध चराई रोखण्यासाठी धडक मोहीम हाती घेणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कारवाई दरम्यान चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्राधिकारी आशिष कोकाटे, वर्तुळ अधिकारी एम.के. निर्मळ, सतिश नाईक, अभिजित कथलकर,शेख रफिक आदी उपस्थित होते.